Friday, October 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut on Baba Siddique : "गृहमंत्र्यांचा राजीनामा नको, आता त्यांना थेट…";...

Sanjay Raut on Baba Siddique : “गृहमंत्र्यांचा राजीनामा नको, आता त्यांना थेट…”; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर संजय राऊत फडणवीसांवर संतापले

मुंबई | Mumbai

काल (शनिवार) रात्री तीन जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची गोळ्या घालून हत्या केली. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddiqui) यांच्या कार्यालयासमोरच त्यांच्यावर हा गोळीबार (Firing) करण्यात आला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तर एकाचा तपास सुरु आहे. अशातच आता याप्रकरणावरून विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘सिंघम’ फडणवीसांना गृहमंत्रिपदावरून हाकला, अशा शब्दात टीका केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात; आरोपींची नावे आली समोर

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “बाबा सिद्दीकींच्या हत्येची (Murder) घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. सिद्दीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. तरीही मारेकऱ्यांनी त्यांना खुलेआम गोळ्या घातल्या. महाराष्ट्राच्या राजधानीत हत्यांचे सत्र सुरू आहे. या घटना आता माजी मंत्री, आमदारांपर्यंत पोहोचल्या आहेत. या राज्यात कोण सुरक्षित आहे? हे राज्याच्या अपयशी गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले पाहिजे. सामान्य जनता, महिला, व्यापारी, उद्योगपती सुरक्षित नाहीत. आता राजकीय नेते, मांजी मंत्र्‍यांवर जर हल्ला होत असेल तर गृहखाते काय करत आहे? राज्याचे गृहमंत्री (Home Minister) हरियाणात (Haryana) विजय झाला म्हणून इथे पेढे वाटतात. पेढे खा, पण राज्यात दिवसाढवळ्या खून, खंडणी सत्र सुरू असताना गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही?” असा सवाल राऊत यांनी केला.

हे देखील वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या

पुढे ते म्हणाले की, “राज्याच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय आणि अपयशी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नोंद होईल.आतापर्यंत आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा (Resignation) मागत होतो. पण आता गृहमंत्र्यांना हाकला, असे सांगण्यांची वेळ आली आहे. देवेंद्र फडणवीस एकेकाळी काय होते आणि काय झाले आहेत, आमच्या डोळ्यासमोर अधःपतन झालेले पाहिले आहे.विरोधकांबाबत काड्या करण्यापेक्षा, रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा गृहमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली त्या पदाला कर्तव्यभावनेने जागून काम करा”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

हे देखील वाचा : बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली

तसेच “कालची घटना दुर्देवी आहे. आमची देखील सुरक्षा काढून घेतली असून हे सुडबुद्धीचे राजकारण आहे. त्याची आम्हाला चिंता नाही. पण दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाचाच एक नेता, ज्याला वाय दर्जाची सुरक्षा आहे, अशा नेत्याची हत्या होणे गंभीर आहे. भविष्यात कारणं उघडे होईल. हत्या झाली, मुंबईत (Mumbai) झाली, भरवस्तीत झाली, यावर गृहमंत्र्यांनी खुलासे करू नये. त्यांना खंत वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, किंवा राज्यपालांनी त्यांचा राजीनामा घ्यावा”, असेही संजय राऊत म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या