मुंबई | Mumbai
राज्य सरकारने २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने”ची (CM Ladki Bahin Yojana) आणली आहे. या योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यांत महिलांची (Women) सदर योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ होतांना दिसत आहे. तसेच ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे ३००० रुपये देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या या योजनेचा राज्य सरकारकडून जोरदार प्रचार केला जात आहे.
हे देखील वाचा : “नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे कटकारस्थान करून…”; अनिल देशमुखांचा सरकारवर गंभीर आरोप
दुसरीकडे विरोधकांकडून राज्य सरकारने (State Government) आणलेल्या या योजनेवर टीका केली जात आहे. तसेच या योजनेच्या पैशांवरून राजकीय वर्तुळात देखील अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच आता सदर योजनेबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे विधान केले आहे.
हे देखील वाचा : संपादकीय : १७ ऑगस्ट २०२४ – कोणाच्या तरी हास्याचे कारण व्हा
संजय राऊत यांना माध्यम प्रतिनिधींनी लाडकी बहीण योजना टर्निंग पॉईंट ठरणार आहे? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अजिबात नाही, कदाचित त्यांच्यासाठी तो यू टर्न ठरेल. टर्निंग पॉईंट वगैरे काही नाही. अशा खूप योजना महाराष्ट्र सरकारने राबवल्या आहेत. ही नवीन योजना नाही. त्यांनी फार मोठी क्रांती केली नाही. महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वी आल्या आहेत. फडणवीस, अजित पवार आणि मिंधे दीड हजार रुपये खिशातले देत नाहीत. लोकांच्या करातला पैसा आहे. महिलांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे.आमचे सरकार आल्यावर पंधराशेचे आम्ही तीन हजार करु. हा आमचा शब्द आहे, असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : रामगिरी महाराजांवर वैजापूर, नगर, संगमनेरात गुन्हे दाखल
मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर राऊतांचा निशाणा
काल महाविकास आघाडीच्या झालेल्या संयुक्त मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी “काँग्रेस, राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपदाचा कोणता चेहरा असेल, तर त्यांनी समोर आणावा, मी त्यांना पाठिंबा देईल, त्यानंतर कॅम्पेन होईल”, असे जाहीर विधान व्यासपीठावरून केले होते. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. तसेच महायुती मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा दाखवत आहे का? आजचे मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे), अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस २०२४ च्या निवडणुकीत मुख्यमंत्री राहतील का? दिल्लीवरून विनोद तावडे येणार आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे, असे त्यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा