Friday, May 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Shirsat: निदा खान छ. संभाजीनगरमध्येच कशी लपली? इम्तियाज जलील यांची चौकशी...

Sanjay Shirsat: निदा खान छ. संभाजीनगरमध्येच कशी लपली? इम्तियाज जलील यांची चौकशी करा; संजय शिरसाटांचा गंभीर आरोप

छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. महिला कर्मचाऱ्यांचे शोषण, सक्तीने धर्मांतर करण्याचे प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग आणि मानसिक छळ यांसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या नऊ गुन्ह्यांची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. यातील प्रमुख संशयित असलेल्या निदा खान हिला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून गुरवारी रात्री अटक केली आहे. मागील २५ दिवसांपासून निदा खान पोलिसांच्या नजरेतून वाचत छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरात लपून बसली होती.

छत्रपती संभाजीनगर येथून नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने तिला छत्रपती संभाजीनगरमधील नरेगाव परिसरातील कैसर कॉलनीतील एका फ्लॅटमधून ताब्यात घेतले आहे. आता संशयित निदा खान अटकेनंतर सामाजिक न्याय मंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केलाय.

- Advertisement -

मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, काल संभाजीनगरमधून नाशिक पोलिसांनी धर्मांतरप्रकरणी निदा खान या मुख्य आरोपीला अटक केली. मार्चमध्ये ही घटना घडली होती. निदा खान दीड-दोन महिने कुठे होती हे माहीत नाही. निदा खान संभाजीनगरमध्ये अशा परिसरात लपली होती, जो झोपडपट्टीचा भाग आहे. तिथे अमली पदार्थांचे धंदे चालतात. ही खान एकटी नव्हती तर तिची आई आणि मावशी तिच्या सोबत होती. तिला एमआयएमने सहकार्य केले.

Maharashtra SSC Board Result 2026: मोठी बातमी! दहावी परिक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनी मारली बाजी, कोणता विभाग ठरला अव्वल?

इम्तियाज जलील यांनी उघडपणे वक्तव्य केले होते
एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मागे सुद्धा त्या संदर्भात उघडपणे वक्तव्य केले होते आणि एका अर्थाने तिला पाठिंबा दर्शविला होता. इतरही ठिकाणी एमआयएम त्यांच्या हालचाली वाढवत आहेत. धर्मांतर करणे, मुलींना फसवणे हे सगळे प्रकार एमआयएमच्या नेतृत्वात होतात. निदा खान हा एक मोहरा आहे. त्यांचे महाराष्ट्रभर जाळे पसरले आहे. पुणे, संभाजीनगरसह सगळीकडे असे प्रकार पाहायला मिळतील. हिंदुंचा द्वेष करण्याचे प्रकार सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केलाय.

जलील यांची चौकशी झाली पाहिजे
संजय शिरसाट पुढे म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी करणार आहे. मुख्य सूत्रधार कोण? याचा शोध लागला पाहिजे. 22 ते 30 वर्षांच्या दरम्यानच्या तरुणांना असे प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्याकडे नोकरी नाही तरी त्यांच्याकडे पैसा आहे. बाईक आहेत हा पैसा कुठून येतो? बलात्कार, नशेखोरीचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. इम्तियाज जलील यांची देखील चौकशी झाली पाहिजे. हे एक मोठं षडयंत्र आहे. निदा खानला का उघड पाठिंबा दिला? तिच्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. निदा खान इतर कुठेही न जाता केवळ संभाजीनगरलाच का जाते? याआधी देखील दहशतवादी हालचालींसाठी संभाजीनगर प्रसिद्ध आहे, असे देखील त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

कोटी

Ashok Kharat Case: एक कोटी दहा लाखांचं सोनं, चांदी, अमेरिकन डॉलर्स…;...

0
नाशिक | प्रतिनिधीआध्यात्मिक शक्तीचा धाक दाखवून सर्वसामान्यांच्या श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या अशोक खरात या स्वयंघोषित भोंदूबाबाच्या पापाचा घडा आता भरला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) खरातच्या...