Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Shirsat: हाती सिगारेट, पैशांची बॅग, Viral Video वर मंत्री संजय शिरसाटांची...

Sanjay Shirsat: हाती सिगारेट, पैशांची बॅग, Viral Video वर मंत्री संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | Mumbai
हातात सिगारेट आणि शेजारी पैशांची बॅग असलेला मंत्री संजय शिरसाट यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप खरे ठरल्याची चर्चा सुरु झालीये. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीच हा व्हिडीओ समोर आणला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ माझ्या बेडरुममधला असून त्या बॅगेत पैसे नसून कपडे आहेत, असा दावा शिरसाट यांनी केला आहे. असे असतानाच आता हा व्हिडीओ नेमका व्हायरल कसा झाला? विचारले जात आहे. यावरही शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कथित पैशाच्या बॅगेप्रकरणी आता मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले असून, त्यांच्या घरातील हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला यावर भाष्य केले आहे. आज विधानसभेच्या प्रांगणात पत्रकारांशी बोलताना शिरसाट यांना त्यांच्या घरातील व्हिडिओ कोणी व्हायरल केला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

- Advertisement -

संजय शिरसाट म्हणाले, व्हिडीओ काय दाखवतोय? माझे घर आहे. जे घर तुम्ही पाहात आहात ते माझ घर आहे, बेडरुम आहे. बेडरुममध्ये मी बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा आहे. तिथे एक बॅग ठेवलेली आहे. याचा अर्थ असा होतो की, मी कुठून तरी प्रवासातून आलोय. कपडे काढले आहेत, मी माझ्या बेडवर बसलेलो आहे. अरे मुर्खांनो एवढी मोठी पैशांची बॅग ठेवायची असेल तर कपाटं मेली आहेत का? मी नोटा कपाटात ठोसल्या असत्या. यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही.

YouTube video player

“आमच्याकडे मातोश्री आणि मातोश्री २ नाही. माझे घर माझ्या मतदारसंघातील प्रत्येकासाठी उघडे असते. कार्यकर्ते येतात, उत्साहाच्या भरात कोणीतरी व्हिडिओ काढला असेल. माझ्या घरात चिठ्ठी देऊन कोणालाही बोलावले जात नाही. काम काय, नाव काय, या गोष्टी विचारल्या जात नाहीत”, असेही संजय शिरसाट म्हणाले.

पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले, एकदा एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षारक्षकांकडील बॅगांमध्ये देखील पैसे असल्याचे म्हणाले होते. यांना कपडे ठेवायला बॅगा लागत नाहीत. तर पैसे ठेवायला बॅगा लागतात. असे एकत्रित यांचे वर्तन आहे. प्रवासातून आल्यानंतर ठेवलेली ती बॅग आहे. असे लोक टार्गेट करतात. माझे नाव पुढे आणत आहेत. पैशांच्या बॅगा दरवाज्यात पडत नाहीत. अशा प्रकारच्या व्हिडीओमुळे माझ्या करिअरवर परिणाम होणार नाही. ते कपडे होते, पैसे नव्हते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikदैनिक 'देशदूत' आयोजित गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६फला आजपासून (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी...