Wednesday, May 8, 2024
Homeदेश विदेशजेट एअरवेजला संजीव कपूर पावणार का?

जेट एअरवेजला संजीव कपूर पावणार का?

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

जेट एअरवेजचे (Jet Airways) नवे सीईओ म्हणून संजीव कपूर (Sanjiv Kapoor) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॅलरॉक-जालान कन्सोर्टियमने (Kalrock-Jalan consortium) त्यांची निवड केलेली आहे. ते ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सचे अध्यक्ष आहेत.

- Advertisement -

संजीव कपूर हे ४ एप्रिलपासून जेट एअरवेज (Jet Airways) कार्यभार हाती घेणार आहे. कपूर यांनी २०१४-१५ मध्ये स्पाइसजेटचे (spicejet) सीओओ तसेच नोव्हेंबर २०१३ ते ऑक्टोबर २०१५ दरम्यान सीईओ म्हणून काम पाहिले आहे.

२०१६ पासून २०१९ पर्यंत विस्तारा येथे चीफ स्टॅटेजी अँड कमर्शियल ऑफिसर म्हणून संजीव कपूर कार्यरत होते. कन्सोर्टियमने एका निवेदनात म्हटले आहे की, संजीव कपूर यांच्या कार्यकाळात, एअरलाइनने दिवसाला ९ वरुन ४० विमाने आणि ४० वरून २०० पेक्षा जास्त उड्डाणे घेत प्रगती केली असल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या