Friday, May 3, 2024
Homeनगरसंजीवनी फाउंंडेशनच्यावतीने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण- कोल्हे

संजीवनी फाउंंडेशनच्यावतीने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण- कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेल्या आगामी पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त तरुणांची निवड होण्यासाठी,

- Advertisement -

त्यांना मैदानी कसोट्यांचे व लेखी परीक्षांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी संजीवनी फाउंडेशनच्या वतीने तीन महिण्यांचे प्रशिक्षण संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली देणार असल्याची माहिती संजीवनी फाउंडेशनचे सचिव सुमित कोल्हे यांनी दिली आहे.

श्री. कोल्हे यांनी म्हटले आहे, ग्रामीण भागातील युवकांमध्ये शारीरिक क्षमता व बुध्दिमत्ता असताना देखील योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते पोलीस भरतीपासुन वंचित राहु शकतात. या अनुषंगाने त्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे या हेतुने संजीवनी फाऊंडेशनच्या वतीने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी असे तीन महिन्यांचे प्रशिक्षण संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटर फॉर सिव्हिल अँड डीफेन्स सर्विसेस या संस्थेमध्ये देण्यात येणार आहे.

इच्छुक युवकांनी ट्रेनिंग सेंटरचे निवृत्त सैनिकी अधिकारी दादासाहेब तिवारी यांचेकडे नाव नोंदणी करावी. युवकांचा मेळावा दि. 23 नोव्हेंबर रोजी संजीवनी प्रि कॅडेट सेंटरमध्ये घेण्यात येणार आहे व प्रत्यक्ष प्रशिक्षणास 1 डिसेंबर पासुन सुरूवात करण्यात येणार आहे. सुशिक्षित युवक युवतींच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी यापुर्वी कोव्हिड 19 च्या काळात नामांकित कंपन्यांना संजीवनी अभियांत्रिकी व पॉलीटेक्निकमध्ये आमंत्रित करून कोविड 19 चे मार्गदर्शक तत्वे पाळुन परीसर मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते.

यात सुमारे 400 मुला मुलींना रोजगार उपलब्ध करून देण्यात फाऊंडेशनला यश प्राप्त झाले. आता युवकांना पोलीस भरतीचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने महाराष्ट्र शासनाने पोलिसांची 13000 पदे भरण्याचे जाहिर केलेले आहे. यातही युवकांसाठी मोठी संधी मिळेल, असा आशावाद श्री. कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. संजीवनी फाउंंडेशन अंतर्गत देण्यात येणार्‍या पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त युवकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन सुमित कोल्हे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या