Friday, May 3, 2024
Homeब्लॉगअध्यात्माचा विश्वचषक

अध्यात्माचा विश्वचषक

संत राजिंदर सिंह जी महाराज

ज्या प्रमाणे खेळाडू विश्वचषक स्पर्धेमध्ये भाग घेतो त्याप्रमाणे आपण सुद्धा अध्यात्म, आत्मानुभव आणि प्रभू प्राप्तीचा विश्वचषक मिळवण्यासाठी त्याच आवडीने ध्यान-अभ्यास करू शकतो.

- Advertisement -

जगभरातील लोक विश्वचषक स्पर्धा पाहतात. विविध संघाना परस्परांशी सामना खेळताना पाहून त्यांना आश्चर्य वाटते की माणसाने ठरविले तर तो काय करू शकत नाही कोणतीही व्यक्ती जिने जीवनात कोणत्याही क्षेत्रात यश संपादन केले आहे तिने मेहनत करून आणि कधीही हिंमत न हारता केलेल्या सरावा मुळे प्राप्त केले आहे.

जर अध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपल्याला ध्येय प्राप्त करावयाचे असेल तर आपण कधीही हार मानता कामा नये. आपण जेथे आहोत, तिथपासून आपण एक लांब असा मार्ग आक्रमण करीत असतो, जेणेकरून दिव्य ज्ञान प्राप्त करू शकू. अर्थात अध्यात्मिक दौलतीचा खजिना आपल्या अंतरी आहे. आपल्या शरीरातील नसांन पेक्षाही तो अधिक जवळ आहे. परंतु आपणाला ते शोधण्यासाठी तंत्रज्ञान (टेक्निक) आपल्याकडे असणे आवश्यक आहे. आपले अध्यात्मिक ध्येय आपल्या अगदी जवळ आहे. तरी देखील ते आपल्यापासून अपेक्षेपेक्षा खूप दूर आहे. कारण की आपण आपल्या मनाला स्थिर करण्यासाठी, आपल्या विचारांना थांबविण्यासाठी, अंतरी पूर्णपणे एकाग्र होण्यास, आपण असमर्थ आहोत. या जगातील लाखो आकर्षणे आपल्या ध्यानाला अंतरी टिकू देत नाहीत.

ध्यान-अभ्यास हे असे तंत्र आहे ज्यामुळे आपल्या अंतरी असलेल्या अध्यात्मिक दौलती वर आपण लक्ष केंद्रित करू शकतो. ध्यान-अभ्यास आपल्या एकाग्रते मध्ये वाढ करू शकतो. आपण धैर्य आणि निरंतरता हे गुण शिकतो. हे दोन्ही गुण अध्यात्मिक प्रगती करण्यास आपल्याला मदत करतात. हा नियमितपणे साधना करण्याचा मार्ग आहे. आपण ध्यान-अभ्यास करण्यासाठी तेवढेच नियमित आणि समर्पित व्हायला पाहिजे, जसे एखादा खेळाडू कोणतीही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असतो. आपण सुद्धा अध्यात्माचा विश्वचषक जिंकू शकू. ध्यानाभ्यासाने आपण फारच कमी वेळात अध्यात्मिक चषक जिंकू शकतो. तो म्हणजे आपल्या आत्म्याचे मिलन परमात्म्याशी करणे असा आहे.

ध्यान अभ्यास करते वेळी आपण आंतरिक शांति व आनंदाचा अनुभव करतो. रोज ध्यान-अभ्यास केल्याने आपल्या अंतरी एकाग्रता टिकून राहण्याची क्षमता वाढत जाते. दररोज ध्यान केल्याने आपल्या अंतरी एकाग्रता येते व आपल्या क्षमतेमध्ये वाढ होत जाते. आपण आपल्या अपयशाला घाबरून हार मानता कामा नये.

आपण किती वेळा पर्यंत आपले शरीर आणि मन यांना शांत ठेवू शकतो, तसेच आपण निर्विचार अवस्थेत एकाग्र होऊन किती वेळा पर्यंत राहतो, यावर ध्यान-अभ्यासाच्या प्रगतीचे मोजमाप अवलंबून असते. या साठी नेहमी प्रयत्न करीत राहिले पाहिजे. आपण कधीही हार मानता कामा नये. तेव्हा आपल्या लक्षात येईल की एक दिवस असा येईल की आपले ध्येय प्राप्त झालेले असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या