Friday, May 3, 2024
Homeब्लॉगआज आभार प्रकट दिन : प्रभूकडून मिळालेला आनंद वाटू या...

आज आभार प्रकट दिन : प्रभूकडून मिळालेला आनंद वाटू या…

संत राजिन्दर सिंह जी महाराज

अमेरिकेत आभार प्रकट दिनाचे विशेष महत्त्व आहे. हा दिवस युरोप आणि इतर देशांतून आलेल्या लोकांनी अमेरिकेतील लोकांनी त्यांना जी सहाय्यता केली त्यानिमित्त सुरू केला होता, परंतु कालांतराने हा दिवस आभार प्रकटदिनाच्या रुपात प्रचलित होत गेला. बर्‍याचदा जेव्हा आपणास इतरांकडून एखादी वस्तू मिळते, तेव्हा आपण त्यांना धन्यवाद म्हणतो. आपण प्रभुंकडून मिळालेल्या सर्व उपहारांकरिता सुद्धा त्यांचे धन्यवाद करतो.

- Advertisement -

आपण सर्वप्रथम पिता-परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. कारण त्यांनी आपणास हे मानव शरीर दिले आहे. या शरीरात आपण स्वतःला ओळखू शकतो आणि पिता-परमेश्वराला प्राप्त करू शकतो. आपल्या जीवनात प्रभुंनी आपणास अनेक उपलब्धी दिल्या आहेत. जर आपण एक स्वस्थ जीवन व्यतीत करत असू तर, आपणास प्रभूचे आभार मानले पाहिजे. जर आपणास दररोज भोजन मिळत असेल तर त्यासाठी सुद्धा आपण प्रभुंचे आभार मानले पाहिजे. कारण बऱ्याच लोकांच्या नशिबात दोन वेळचे सुद्धा पोटभर भोजन नसते.

जर आपण आर्थिक रूपाने संपन्न असू तर त्याकरिता सुद्धा आपण प्रभुंचे आभार मानले पाहिजे, कारण आपण असे पाहतो की गरीबीमुळे जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा प्रकारे आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये प्रभूची अपार कृपा आहे, त्याकरिता केवळ आभार प्रकट दिनी नव्हे तर दररोज प्रभुंचे आभार मानले पाहिजे.

आभार प्रकट दिनी आपण केवळ प्रभुचे धन्यवाद करण्यापुरतेच मर्यादित न राहता या दिवशी आपण हा ही प्रण करावा की, प्रभुकडून मिळालेल्या या खुशीला आपण सर्वांबरोबर वाटू या आणि दुसऱ्यांची सेवा करू या. आपण अनेक प्रकारे जसे की शारीरिक, मानसिक, आर्थिक रूपात आपण सहयोग करू शकतो. जर कोणी आजारी असेल तर आपण त्यांची शारीरिक रूपात मदत करू शकतो. जर कोणी मानसिकरीत्या त्रस्त असेल तर आपण त्यांना सहानुभूती देऊन त्यांची मदत करू शकतो आणि जर कोणी आर्थिक संकटांचा सामना करत असेल तर आपण आपल्या क्षमतेनुसार त्यांची मदत करू शकतो.

अध्यात्मिक स्वरूपात एखाद्याची मदत कोणी संत आणि गुरूच करू शकतात. कारण ते लोकांना ध्यान-अभ्यासाद्वारे प्रभुंच्या ज्योति आणि श्रुतिशी जोडतात, जेणेकरून ते त्यांच्या आत्म्याला या भौतिक संसारातून काढून प्रभूच्या खऱ्या घरी सचखंडा मध्ये पोहोचवितात.

चला तर!, आपण या आभार प्रकटदिनी असा संकल्प करूया की, आपण केवळ प्रभुं कडून मिळालेल्या उपलब्धींचेच आभार प्रकट करतानाच, इतरांना सुद्धा मदत करूया. जर आपण असे केले तर आपल्या लक्षात येईल की, या जगातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही वस्तू करिता वंचित राहणार नाही. असे केल्याने आपण एका अशा विश्व निर्मितीत मदत करीत आहोत, ज्यामध्ये इतरांना प्रेम देणे आणि एकमेकांची काळजी घेणे महत्त्वपूर्ण असेल. जर प्रत्येक व्यक्तीने असे जीवन जगण्याचा प्रण केला तर आपण पहाल की तो दिवस दूर नाही, जेव्हा या धरतीवर प्रभुचे राज्य स्थापन होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या