Sunday, May 5, 2024
Homeमनोरंजनप्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचं निधन

प्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचं निधन

प्रसिद्ध भारतीय संगीतकार आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma) यांचे निधन झाले.

हृदयविकाराने आज सकाळी त्यांचे निधन झाले. पंडित शिवकुमार शर्मा हे ८४ वर्षांचे होते.

- Advertisement -

पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने भारतीय संगीत विश्वातील एक मोठा सितारा निघून गेला आहे.

पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाच्या बातमीने संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहें.

जम्मूमध्ये जन्मलेल्या पंडित शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या तेराव्या वर्षी संतूर शिकायला सुरुवात केली. 1955 मध्ये मुंबईत त्यांचा पहिला सार्वजनिक परफॉर्मन्स होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या