Friday, May 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBeed News: संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव का झाला? धनंजय देशमुख म्हणाले, रोजचे...

Beed News: संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव का झाला? धनंजय देशमुख म्हणाले, रोजचे देवाण घेवाण…

बीड | Beed
बीडमधील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनामुळे मस्साजोग येथे पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यात लढत झाली. त्यात अश्विनी देशमुखांचा पराभव झाला आहे. तर स्वरूपानंद देशमुख हे विजयी झाली झाले आहेत. अश्विनी देशमुख यांना या निवडणुकीत ९२ मतांनी पराभव पत्कारावा लागला.

स्वरूपानंद देशमुख यांनी गावाच्या विकासावर तर मयत संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या नावावर मते मागितली होती. यात अखेर गावकऱ्यांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला. तब्बल ९२ मतांनी स्वरूपानंद देशमुख विजयी झाले आहेत. मागच्यावेळी संतोष देशमुख यांनी त्यांचा ९ मतांनी पराभव केला होता. आता स्वरूपानंद देशमुख यांना एकूण ९१४ मते मिळाली आहेत. तर अश्विनी देशमुख ८२२ मते मिळाली. या निवडणुकीनंतर आता संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले धनंजय देशमुख?
धनंजय देशमुख म्हणाले, आज अनपेक्षित निकाल लागला आहे. गावासाठी जे अण्णांनी बलिदान दिले आहे राहिलेले १८ महिने हे त्यांच्याच नावाने ही ग्रामपंचायत चालावी असे माझे मनोमन मत होते. परंतु तसे झाले नाही. १६ महिन्यापासून जो न्यायालयीन लढा आणि रस्त्यावरची लढाई सुरू होती त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कुटुंबाचा सगळ्याचा वेळ गेल्यामुळे गावकऱ्यांसोबत जे काय रोजचे देवाण घेवाण संबंध होते ते कुठेतरी दुरावा निर्माण झाला. त्याचा फायदा निवडणुकीतील समोरच्या उमेदवाराला झाला आणि आमचा पराभव झाला. विजयी उमेदवाराला शुभेच्छा चांगल्या कामासाठी कायम सोबत राहणार आहे.

Bacchu Kadu: …तर एकनाथ शिंदेंचा पाईक म्हणून काम करु; उमेदवारीवरुन बच्चू कडू काय म्हणाले?

“संतोष अण्णा असताना माझे आणि गावाचे जे संबंध होते, ते नीट राहिले नाही. अण्णांना न्याय मिळवून देण्यासाठी देण्यासाठी मला, कुटुंबाला आणि गावाला रस्त्यावर उतरावे लागले. प्रत्येकवेळी प्रत्येक व्यक्ती मला वेळ देऊ शकत नाही. मला या प्रकरणात दिल्लीपर्यंत जायची वेळ आली आहे. भविष्यातही जावं लागणार आहे. गावकऱ्यांना मला वेळ देणं झाला नाही, हे ही पराभवाचे कारण आहे. आता आमचा राजकीय वाद संपला आहे. आता आम्ही पुढे जाणार आहोत. गावच्या विकासाठी आम्ही मदत करायला तयार असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले.

अवादा कंपनीच्या आरोपावर धनंजय देशमुख म्हणाले..
धनंजय देशमुख यांच्यावर निवडणुकीच्या काळात 58 लाखाच्या सी एस आर फंडासंदर्भातील आरोपावर धनंजय देशमुख म्हणाले, ते सरपंच झाले आहेत माझ्या मनात कुठलाही मतभेद नाही. गावचे सरपंच म्हणून त्यांना मी एक खुलासा मागत आहे. त्यांनी उद्या सकाळी ग्रामपंचायत आवारामध्ये सर्व गावकऱ्यांना बोलवून 58 लाख रुपयाचा जो खुलासा करावा. जे आवादा कंपनीचे मॅनेजर आहेत त्यांना देखील बोलवावे व गावातील सर्व नागरिकांना त्या ठिकाणी बोलवावे. आवादा कंपनीचे मॅनेजर कागदोपत्री बोलतील नेमकं तथ्य काय आहे.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...