श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
दि. 30 जानेवारीपासून सुरू झालेल्या दैनिक सार्वमत 2025 च्या तिसर्या दिवशी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक मान्यवरांनी एक्स्पोला सदिच्छा भेट देऊन खरेदी केली. दरम्यान यानिमित्त आयोजित ‘खेळ पैठणीच्या’ कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेतला. त्यात प्रथम क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या सौ. सुवर्णा मनोज मुळे, तर सौ. प्रियंका सचिन तापोळे व सौ. दिशा राहुल सागडे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतिय क्रमांक पटकविला.
दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पो आयोजन करण्याचे हे पाचवे वर्ष आहे. या महोत्सवासाठी सहप्रायोजक म्हणून साई आदर्श मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटी, राहुरी फॅक्टरी व वासन टोयोटा अहिल्यानगर यांचे सहकार्य लाभले आहे. काल साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे व साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन सौ. संगीता शिवाजीराव कपाळे यांनी या एक्स्पोला सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री.कपाळे यांनी सार्वमतच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. नगर जिल्ह्यात सार्वमतने वाचकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यात शॉपिंग एक्स्पो सारखा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून सलग राबवून ग्राहक व व्यावसायिकांना मोठी संधी उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.
या खरेदी महोत्सवात पहिल्या तीन दिवसांपासून ग्राहकांची गर्दी सुरू झाली. यामध्ये ग्राहकांना खरेदीबरोबरच मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. तसेच खवय्यांसाठीही विविध चमचमीत खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये अनेक खवय्यांनी शेगावची प्रसिध्द कचोरीबरोबरच श्रीरामपूरच्या पॅटीश वड्याची चव चाखली. तर मावा कुल्फी खाण्याचा आनंदही घेतला. नंतर अनेकांनी विविध प्रकारच्या पाणीपुरीवर ताव मारला. मनोरंजनाच्या कार्यक्रमात खास महिलांसाठी आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रमाचा उपस्थित महिलांनी मनमुराद आनंद लुटला. यातील प्रथम तीन विजेत्या महिलांना पैठणी भेट देण्यात आल्या.
या खरेदी महोत्सवामध्ये आज दि. 2 फेब्रुवारी रोजी खुल्या गटातील मुला-मुलींचे सोलो डान्स होणार आहेत. यामध्ये स्थानिक कलाकारांचा कलाविष्कार पहायला मिळणार आहे. तर शेवटच्या दिवशी दि. 3 फेब्रुवारी रोजी खास महिलांकरिता अँकर प्रवीण जमधडे प्रस्तुत ‘खेळ पैठणीचा’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. येथील थत्ते मैदानावर आयोजित सार्वमत शॉपिंग एक्स्पोचे आज दि. 2 फेबु्रवारी व उद्या सोमवार दि. 3 फेब्रुवारी हे शेवटचे दोन दिवसच शिल्लक आहेत.
एका दिवसात दोन ई-बाईकची विक्री
दै. सार्वमत आयोजित शॉपिंग महोत्सव 2025 मध्ये अनेक छोट्या वस्तूंपासून मोठ्या वस्तू खरेदीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. काल तिसर्या दिवशी याठिकाणी अथर्व मोटर्स यांच्या दोन ई-बाईकची विक्री झाली. पहिली बाईक भाऊसाहेब विठ्ठल थोरे (लाडगाव) यांनी तर दुसरी बाईक अशोक बनसोडे (भामाठाण) यांनी खरेदी केली. त्यांना साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, यांच्याहस्ते ई-बाईकची चावी देण्यात आली. यावेळी साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन सौ. संगीता कपाळे, सौ. जयश्रीताई ठेंगे, सद्गुरू ट्रॅक्टर्सचे संचालक सर्जेराव मुंडे, रामभाऊ टेकाळे, अथर्व मोटर्सचे संचालक संदीप हुरूळे, अमोल बोंबले आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आज ‘सोलो डान्स’ कार्यक्रमाचे आयोजन
दै. सार्वमत शॉपिंग महोत्सव 2025 मध्ये आज चौथ्या दिवशी स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून आज दि. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी खुल्या गटातील ‘सोलो डान्स’ या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाग्यवान ग्राहक सोडत
दै. सार्वमत शॉपिंग महोत्सव 2025 ला भेट देणार्या ग्राहकांना कुपन देण्यात येत असून त्यातून दररोज लकी ड्रॉ पध्दतीने भाग्यवान ग्राहक निवडला जात आहे. या ग्राहकास मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात येत आहे. भाग्यवान ग्राहक सोडतीचा निकाल दै. सार्वमतच्या अंकामध्ये प्रसिध्द केला जात आहे. विजेत्या ग्राहकाने ओळखपत्र दाखवून आपली भेटवस्तू घेवून जायची आहे.
कालचे भाग्यवान ग्राहक
काल दि.01 फेब्रुवारी रोजीचे भाग्यवान ग्राहक –
1) सौ. कमल ज्ञानदेव पवार (डावखरवस्ती, श्रीरामपूर)
2) श्री. बंडू शिवराम कोरडे (दळवीवस्ती, श्रीरामपूर),
3) आराध्या रावसाहेब संसारे (सेंट लुक हॉस्पिटल कॉर्टर, श्रीरामपूर)