Monday, February 16, 2026
HomeनगरSarvmat Shopping Expo : दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पोचा आज शेवटचा दिवस

Sarvmat Shopping Expo : दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पोचा आज शेवटचा दिवस

खास महिलांसाठीचा खेळ पैठणीचा कार्यक्रम ठरले चौथ्या दिवसाचे मुख्य आकर्षण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपुरातील थत्ते मैदानावर दि. 12 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2026 ला काल चौथ्या दिवशी ग्राहकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काल भारत-पाकीस्तान दरम्यान क्रिकेटचा सामना असून देखील मोठी गर्दी पहायला मिळाली. विविध वस्तू खरेदीलाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आज सोमवार या शॉपिंग एक्स्पोचा शेवटचा दिवस असून, शेवटच्या दिवशी शहर, तालुका व शेजारच्या तालुक्यातील ग्राहकांनी या महोत्सवात सहभागी होऊन खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

या खरेदी महोत्सवासाठी मुख्य प्रायोजक म्हणून श्री इंम्पेक्स द फर्निचर मॉल, श्रीरामपूर असून सहप्रायोजक साई आदर्श मल्टीस्टेट, राहुरी फॅक्टरी हे आहेत. शहरातील व तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला भगिणींना घरातील कामातून थोडा आराम मिळावा, तसेच त्यांचा विरंगुळा व्हावा, या उद्देशाने शॉपिंग एक्स्पोच्या चौथ्या दिवशी प्रसिध्द निवेदक राजेश मंचरे व सौ. मंचरे प्रस्तूत खेळ पैठणीचा या आकर्षक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळातून चार विजेत्या महिला निवडण्यात आल्या. त्यात प्रथम क्रमांक सौ. अर्चना उत्तम कुताळ (सुभाषवाडी, ता. श्रीरामपूर), द्वितीय क्रमांक सौ. हर्षदा चैतन्य जाधव (सरस्वती कॉलनी, वॉर्ड नं. 7 श्रीरामपूर), तृतीय क्रमांक सौ. भाग्यश्री रोहित कोठारी (वॉर्ड-7, बडाख हॉस्पीटल जवळ, श्रीरामपूर) व चतुर्थ क्रमांक सौ. स्नेहा ललित ताथेड (राम मंदीर चौक, श्रीरामपूर) यांनी मिळविला. त्यांना प्रत्येकी एक पैठणी व सोन्याची नथ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आल्या.

YouTube video player

या कार्यकमाचे प्रायोजक श्रीरामपुरातील प्रसिध्द वस्त्रदालन कृष्णा कलेक्शन यांच्याकडून चार पैठणी तर मे. सोमनाथ रघुनाथ महाले (वडाळकर) ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याच्या चार नथ देण्यात आल्या. कृष्णा कलेक्शनचे संचालक पुरुषोत्तम झंवर, साई मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे, साई आदर्श च्या चेअरमन सौ. संगीताताई कपाळे यांच्या हस्ते विजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात आली. श्रीरामपूर येथील थत्ते मैदानावर दि. 12 फेब्रुवारी पासून हा खरेदी महोत्सव सुरु असून आज सोमवार दि.16 फेब्रुवारी हा शेवटचा दिवस आहे. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत ग्राहकांसाठी खुला असणार आहे. यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. यामध्ये ग्राहकांना विविध वस्तू खरेदीच्या आनंद लुटता येणार असून, त्याचबरोबर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतानाच मनोरंजनाच्या कार्यक्रमाचाही लाभ सायंकाळी घेता येणार आहे.

या शॉपिंग महोत्सवामध्ये विविध गृहोपयोगी वस्तु, विविध उपकरणे, सोलर, विविध औषधे, फॅशनेबल ड्रेसेस, साड्या, महिलांसाठी विविध प्रकारची आकर्षक ज्वेलरी, डिझाईन, विविध सौंदर्य प्रसाधने तसेच टू व्हिलर, फोर व्हिलर अशा विविध छोट्यात छोट्या वस्तूंपासून मोठ्यात मोठ्या वस्तूंपर्यंतचे तसेच लहान मुलांपासून तरुण व वृध्द व्यक्तींना उपयुक्त असलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री याठिकाणी उपलब्ध आहेत. काल शॉपिंग एक्स्पोच्या चौथ्या दिवशी शहर व तालुक्यातील ग्राहकांची तोबा गर्दी पहायला मिळाली, यावेळी विशेषत महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती, महिलांनी आकर्षक ज्वेलरी, डिझाईन, विविध सौंदर्य प्रसाधने घेण्यासाठी प्रत्येक स्टॉलवर मोठी गर्दी केली होती. काल साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक शिवाजीराव कपाळे, साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन सौ. संगीताताई कपाळे, मुळा-प्रवराचे संचालक सिध्दार्थ मुरकुटे, नगरसेविका मंजुश्री मुरकुटे आदींसह अनेक मान्यवरांनी एक्स्पोला सदिच्छा भेट देऊन खरेदी केली.

आज सोमवार या शॉपिंग एक्स्पोचा शेवटचा दिवस असल्याने शहर, तालुका व शेजारच्या तालुक्यातील ग्राहकांनी या महोत्सवात सहभागी होऊन खरेदी बरोबरच चवदार खाद्यपदार्थांचा आस्वाद लुटून मनोरंजनाचाही आनंद घ्यावा, असे आवाहन दैनिक सार्वमत परिवार तसेच या एक्स्पोचे मुख्य प्रायोजक श्री इंम्पेक्स द फर्निचर मॉल, श्रीरामपूर व सहप्रायोजक साई आदर्श मल्टीस्टेट, राहुरी फॅक्टरी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

भाग्यवान ग्राहक सोडत
शॉपिंग एक्स्पोला भेटी दिलेल्या ग्राहकांनी दररोज कुपन भरुन त्याठिकाणी ठेवलेल्या बॉक्समध्ये कुपन टाकायचे आहे. दिवसभरातील जमा झालेल्या कुपनांपैकी यातून 3 भाग्यवान ग्राहकांची लकी ड्रा पध्दतीने सोडत काढली जात असून दररोज तीन भाग्यवंतांना आकर्षक बक्षिस दिले जात आहे. तरी ग्राहकांनी या शॉपींग महोत्सवास भेट देवून मनमुराद खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कालचे भाग्यवान ग्राहक
1) प्रवीण पवार
2) गोकुळ शिरसाठ
3) सुयश सुनील शिंगोटे (पाचेगाव)
(विजेत्यांनी आपले बक्षीस ओळखपत्र दाखवून एक्स्पो स्थळी अथवा दैनिक सार्वमत कार्यालयातून घेऊन जावे.)

आज नामवंत कलाकारांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन
दैनिक सार्वमत आयोजित शॉपिंग एक्स्पो मध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये आज सोमवार दि. 16 फेब्रुवारी सायंकाळी 6 ते 9 यावेळेत नामवंत कलाकारांचा अविष्कार असलेल्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Crime News : एमआयडीसीतील साईबन परिसरात वृध्दाचा खून

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar निंबळक (ता. अहिल्यानगर) शिवारातील साईबन समोरील मोकळ्या पटांगणात एका 75 वर्षीय वृध्दाचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस...