Saturday, September 12, 2026
Homeक्राईमCrime News : एमआयडीसीतील साईबन परिसरात वृध्दाचा खून

Crime News : एमआयडीसीतील साईबन परिसरात वृध्दाचा खून

अज्ञाताने डोक्यात वार करून संपविले || गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

निंबळक (ता. अहिल्यानगर) शिवारातील साईबन समोरील मोकळ्या पटांगणात एका 75 वर्षीय वृध्दाचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बापु नामदेव शिंदे (रा. मनोरमा कॉलनी, साईनाथनगर, अरूण हॉटेल मागे, नवनागापूर, अहिल्यानगर) असे खून झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

- Advertisement -

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन बापु शिंदे (वय 40, रा. मनोरमा कॉलनी, साईनाथनगर, अरूण हॉटेल मागे, नवनागापूर, अहिल्यानगर) यांनी रविवारी (15 फेब्रुवारी) पहाटे फिर्याद दिली आहे. सदरची घटना शुक्रवारी (13 फेब्रुवारी) दुपारी दोन ते शनिवारी (14 फेब्रुवारी) रात्री 10:41 वाजताच्या दरम्यान घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बापू नामदेव शिंदे यांचा शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून ते शनिवारी रात्री 10.41 वाजेच्या दरम्यान खून करण्यात आला आहे. ही घटना साईबन समोरील मोकळ्या पटांगणात, विळद बायपासजवळ, निंबळक गावच्या शिवारात घडली. अज्ञात आरोपीने कोणत्यातरी कठीण साधनाने बापु शिंदे यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले असून त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. बी. चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन तसेच स्थानिकांकडून चौकशी सुरू करण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : शाळेच्या बसला अपघात

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati पडसाद मूकबधिर विद्यालयाच्या बसचे अचानक ब्रेक निकामी होऊन स्टेअरिंग लॉक झाल्याने शनिवारी (दि. १२) दुपारी पंचवटीतील गोदाघाट परिसरात अपघात झाला. चालक...