Wednesday, December 4, 2024
Homeनाशिकसातपूरला नाना पटोलेंविरोधात भाजपचे 'जोडे मारो' आंदोलन

सातपूरला नाना पटोलेंविरोधात भाजपचे ‘जोडे मारो’ आंदोलन

सातपूर | प्रतिनिधी Satpur

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Congress state president nana patole) यांचा जाहिर निषेध करुन आज सातपूरमध्ये जोडो मारो आंदोलन करण्यात आले….

- Advertisement -

‘मी मोदिला मारु शकतो,अन् शिव्याही देऊ शकतो’ असे वादग्रस्त विधान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतेच भंडारामधील जेवणाळा येथे केले. याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. पटोले यांच्या या वादग्रस्त विधानानंतर खळबळ उडाली. नाना पटोले (Nana Patole) यांच्या विधानानंतर भाजपने आता आक्रमक भुमिका घेतली आहे.

याचे पडसाद आज सातपूरमध्ये पहावयास मिळाले. नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे (mla seema hire) यांच्या नेतृत्वात त्यांच्या जनसंपर्क कार्यालया समोर पटोले यांचा जाहिर निषेध करत जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी भाजप आमदार सीमा हिरे, रश्मी हिरे बेंडाळे, शहर अध्यक्ष गिरिश पालवे, महेश हिरे, नगरसेविका डॉ.वर्षा भालेराव, इंदूबाई नागरे, निलेश भंदुरे, रामहरी संभेराव, भगवान काकड, गणेश बोलकर, रविंद्र उगले, अंबादास आहिरे, विकी पाटील आदीसह सातपूर मंडलचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या