Sunday, May 19, 2024
Homeनाशिकसावरगाव जि.प. शाळेला शिक्षक, इमारतीची प्रतीक्षा

सावरगाव जि.प. शाळेला शिक्षक, इमारतीची प्रतीक्षा

निफाड । प्रतिनिधी Niphad

सन 2015 पासून शाळेची इमारत (School building) निर्लेखित झालेली असतांनाही आता विद्यार्थ्यांना (students) ज्ञानदान करणार्‍या शिक्षकांची (teachers) संख्या देखील अपुरी असून विद्यार्थ्यांच्या (students) शिक्षणाचा (education) विचार करता ग्रामपंचायतीने (grampanchayat) दोन खासगी शिक्षकांची नियुक्ती करीत यावर उपाय काढला.

- Advertisement -

ग्रामपंचायतीने दिलेल्या दोन हेक्टर जागेवर पत्र्याचे शेड टाकत शाळा भरविली जात असून तालुक्यातील सावरगाव (Savargaon) जि.प. च्या शाळेकडे लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षण विभाग (education department) यांचे दुर्लक्ष झाल्याने व ग्रामस्थांच्या निवेदनाला (memorandum) केराची टोपली दाखविल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांचेमध्ये लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांविरोधात संतापाची भावना तयार झाली आहे.

तालुक्याच्या उत्तरेकडील सरहद्दीवर असलेल्या सावरगाव येथे जि.प. ची केंद्र शाळा आहे. मारूती मंदिरामागील ब्रिटीशकालिन शाळेची इमारत जिर्ण झाल्याने सन 2016 मध्ये ग्रामपंचायत व शाळेच्या वतीने सदरची इमारत (building) निर्लेखित करून नवीन इमारतीचा प्रस्ताव जि.प. कडे पाठविण्यात आला. मात्र पाच वर्षाचा कालावधी उलटून देखील इमारत बांधकामाची फाईल पुढे सरकत नसल्याने ग्रामपंचायत व ग्रामस्थांंनी ग्रामपंचायतीच्या दोन हेक्टर जागेचे सपाटीकरण करून तेथे पत्र्याचे शेड बांधत पार्टीशन करून वर्गखोल्यांमध्ये रूपांतर केले.

परिणामी आता याच शेडमध्ये इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतचे वर्ग भरविण्यात येत आहे व याच ठिकाणी जि.प. शाळेची इमारत व्हावी यासाठी ग्रामपंचायत सरपंच हिराबाई बाबाजी कुशारे, उपसरपंच पोपट पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad), जि.प. च्या शिक्षण सभापति सुरेखा दराडे (Education Chairman Surekha Darade), गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार (Group Education Officer Keshav Tungar) यांना निवेदन (memorandum) देत आपली कैफियत मांडली.

इमारतीचा प्रश्न प्रलंबित असतांनाच येथे इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतच्या वर्गासाठी अवघे 5 शिक्षक कार्यरत असून यातील एक शिक्षिका पुढील महिन्यात सेवानिवृत्त (Retired) होत आहे. तसेच 2 पद्वीधर शिक्षकांसह एक मुख्याध्यापकाची जागा अनेक वर्षापासून रिक्त आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी ग्रामपंचायतीने दोन शिक्षकांची नेमणूक केली असून करोना प्रादूर्भावामुळे ग्रामपंचायतीचा वसूल होत नसल्याने या दोन शिक्षकांना वेतन देता आले नाही.

शासन भले कितीही 100 टक्के साक्षरतेचा डंका पिटवत असले तरी सावरगावच्या शाळेकडे पाहिल्यास शिक्षणाचे विदारक दृश्य समोर येते. त्यामुळे प्रत्येक शाळेला इमारत व पुरेसा शिक्षक वर्ग नियुक्त करणे गरजेचे आहे.

जागा दिली आता इमारत द्यावी आमच्या जि.प. शाळेची ब्रिटीशकालिन इमारत जिर्ण झाल्याने ती सहा वर्षापूर्वीच निर्लेखित झाली आहे. मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करता ग्रामपालिकेच्या मालकीची असलेली दोन हेक्टर जागेचे सपाटीकरण करून ती जि.प. कडे हस्तांतर केली आहे. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मदतीने पत्र्याचे शेड बांधून तेथेच शाळा भरविली जाते. शैक्षणिक हिताला प्राधान्य देत शासनाचे संबंंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी येथे अद्यावत इमारत उभी होण्यासाठी पाठपुरावा करून व मुलांच्या शैक्षणिक हिताचा विचार करता शाळेसाठी अद्यावत इमारत उभी व्हावी यासाठीं निधी मंजूर करावा. तसेच पुरेसा शिक्षक वर्ग नियुक्त करावा.

बाबाजी कुशारे, ग्रामस्थ (सावरगाव)

- Advertisment -

ताज्या बातम्या