Friday, May 3, 2024
Homeनगरसावेडीतील गॅस रिफिलिंग सेंटरवर पोलिसांचा पुन्हा छापा

सावेडीतील गॅस रिफिलिंग सेंटरवर पोलिसांचा पुन्हा छापा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी उपनगरातील वैदुवाडी परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी (दि. 6) दुपारी छापा टाकला. गॅस सिलेंडर, गॅस रिफिलिंग मशीन व इतर साहित्य असा 67 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, 26 सप्टेंबर रोजी तोफखाना पोलिसांनी याच सेंटरवर छापा टाकून कारवाई केली होती.

- Advertisement -

पोलीस अंमलदार बाळासाहेब गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून सचिन प्रकाश शिंदे (वय 34 रा. वैदुवाडी, सावेडी, मुळ रा. श्रमिकनगर, नाशिक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैदुवाडी येथील सचिन शिंदे हा राहत्या घराच्या आडोशाला अवैधरित्या घरगुती गॅस टाक्यातून गॅस काढून तो एलपीजी वाहनामध्ये अनधिकृत रिफिलिंग करीत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.

पोलीस अंमलदार बाळासाहेब मुळीक, सचिन आडबल, संतोष खैरे, रणजित जाधव, गुंजाळ यांच्या पथकाने दोन पंचासमक्ष शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला. अवैधरित्या गॅस रिफिलिंग केले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. हे सेंटर चालविणारा सचिन शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेत तेथील सर्व साहित्य जप्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या