Friday, May 3, 2024
Homeनगरसावेडीत दुकान फोडणार्‍या चौघांना अटक

सावेडीत दुकान फोडणार्‍या चौघांना अटक

अहमदनगर|Ahmedagar

सावेडी उपनगरात घरफोडी करणार्‍या चौघांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. संदीप ऊर्फ संजु रामचंद्र गायकवाड (वय 28), मंगेश ऊर्फ अंकल संजु पवार (वय 23), शर्मा हुरमास काळे (वय 35 तिघे रा. प्रेमदान हाडको, सावेडी), राम सुदाम सौदागर (वय 23 रा. वैदुवाडी, भिस्तबाग) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चौघांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

- Advertisement -

दोन दिवसापूर्वी सावेडी उपनगरातील पंचशील हॉटेल शेजारी असलेल्या महावीर सिरँमिक्स बिल्डींग मटेरियल सप्लायर्सचे दुकान फोडून सहा लाख 48 हजार 800 रूपये किंमतीचे प्लंबिंग व बिल्डींगचे सामान अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. या प्रकरणी दुकानाचे मालक अरविंद अमृतलाल मुथ्या (रा. सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

उपनिरीक्षक मेढे यांनी अधिक तपास केला असता घरफोडी करणार्‍या काही संशयितांची नावे त्यांना खबर्‍याकडून समजली. पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मेढे यांनी एक पथक तयार करून चौघांना नगर शहरातील विविध ठिकाणाहून अटक केली. अटक केलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. त्यांच्यासोबत घरफोडी करणार्‍या अन्य तिघांची नावे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. परम्या गायकवाड, लक्ष्मण कुर्‍हाडे, आकाश कुर्‍हाडे असे या आरोपींचे नावे आहेत. ते पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या