Tuesday, July 16, 2024
Homeनाशिकअनुसूचित जमाती कल्याण समिती २३ ऑगस्टपासून जिल्हा दौऱ्यावर

अनुसूचित जमाती कल्याण समिती २३ ऑगस्टपासून जिल्हा दौऱ्यावर

नाशिक | Nashik

- Advertisement -

विधीमंडळाची पंचायत राज समिती (Panchayat Raj Committee) दौऱ्याची जिल्हा परिषद प्रशासनाकडून (ZP Administration) तयारी सुरू असतानाच दुसरीकडे विधीमंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समितीचाही (Scheduled Tribes Welfare Committee) दौरा आला आहे….

अनुसूचीत जमाती कल्याण समिती २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान दौऱ्यावर येत असून, जिल्हा परिषदेत (ZP Nashik) येऊन समिती आढावा घेणार आहे.

समित्यांच्या या दौऱ्यांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाची चांगलीच दमछाक सुरू असून अधिकाऱ्याचे धाबे दणाणले आहे. त्यासाठी अगदी माहिती गोळा करण्यासाठी सोमवारी (दि.१६) शासकीय सुट्टी (Government Holiday) असतानाही जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू होते.

पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच विधानमंडळाने गठित केलेली पंचायत राज समिती नाशिक जिल्हा परिषदेच्या दौऱ्यावर येत असून २५ ते २७ ऑगस्ट असे तीन दिवस समिती मुक्कामी तळ ठोकणार आहे.

या काळात सन २०१६-१७च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवाल तसेच सन २०१७-१८ चा वार्षिक प्रशासन अहवालावर ही समिती आढावा घेणार आहे. समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेदांच्या माहितीबाबतच्या प्रती तसेच वार्षिक प्रशासन अहवालावरील प्रश्नावली व याबाबतची माहिती १७ ऑगस्टपर्यंत विधानमंडळाला सादर करायची आहे. त्यामुळे गत तीन दिवसांपासून शासकीय सुट्टी असताना देखील माहिती गोळा करण्यासाठी जिल्हा परिषदेत अधिकारी व सेवकांची धावपळ सुरू आहे.

सोमवारी देखील जि.प. चे विविध विभागात विभागप्रमुखांसह सेवक कामकाज करत होते. ही धावपळ सुरू असतानाच विधीमंडळाच्या अनुसूचीत जमाती कल्याण समितीचाही नाशिक जिल्हा दौरा आला आहे. ही समिती २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान जिल्हयात येत आहे.

समिती सोमवारी (दि.२३) सायंकाळी ६ ते ८ वाजे दरम्यान जिल्हा परिषदेतील विविध विभागातील अनुसूचीत जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी-सेवक यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात पडताळणी विषयक बाबी तसेच जि.प. यंत्रणेकडून आदिवासी उपयोजना व बाहय क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनाबाबत आढावा घेणार आहे. पंचायत राज समिती दौरा रद्द करण्यासाठी काही लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न झाला.

परंतू, हा प्रयत्न फेल ठरला असून महाराष्ट्र विधानमंडळाने यासंदर्भात राज्याचे प्रधान सचिव व ग्रामविकास सचिवांना पत्र पाठवून नाशिक जिल्हा परिषदेला पंचायत राज समिती देणार असलेली भेट व बैठकीचा कार्यक्रम कळविला आहे. त्यामुळे पुढील आठवडा जिल्हा परिषदेत समित्यांच्या आढाव्याचा राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या