Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमCrime News : विद्यार्थिनींचा पाठलाग करणार्‍या तरूणाला पकडले; गुन्हा दाखल

Crime News : विद्यार्थिनींचा पाठलाग करणार्‍या तरूणाला पकडले; गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचा आणि तिच्या मैत्रिणींचा पाठलाग करणार्‍या एका तरूणास स्थानिक नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आले आहे. संतप्त नागरिकांनी तरूणाला जाब विचारला असता त्याने त्यांच्यासोबत झटापट करण्याचा प्रयत्न केला. दीपक बाळु वायभासे (रा. चिंचेवाडी, ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. भिंगार, अहिल्यानगर) असे त्याचे नाव असून त्याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पीडित 15 वर्षीय विद्यार्थिनीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी आपल्या दोन मैत्रिणींसह शनिवारी (13 डिसेंबर) दुपारी शाळा सुटल्यावर रिक्षाची वाट पाहत शाळेजवळ थांबल्या होत्या. याचवेळी तरूणाने त्यांच्याकडे पाहून त्यांना जवळ बोलावण्याचे अश्लिल इशारे केले. या मुलींनी दुर्लक्ष करून बाजूला थांबल्यानंतर रिक्षाचालक आले आणि त्या घरी जाण्यासाठी निघाल्या. मात्र, तोच तरूण त्यांच्या रिक्षाचा पाठलाग करत घराजवळ पोहोचला.

YouTube video player

रिक्षाचालक यांनी त्याला जाब विचारला असता, त्याने उलट त्यांनाच मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरातील महिला आणि अन्य नागरिकांनी एकत्र येत तरूणास घेराव घातला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तरूणास ताब्यात घेतले.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...