Monday, May 6, 2024
Homeजळगावअरेच्च्या... आदेश नसतांनाही यावल तालुक्यात शालेय पोषण आहारासाठी शाळा तपासणी मोहीम

अरेच्च्या… आदेश नसतांनाही यावल तालुक्यात शालेय पोषण आहारासाठी शाळा तपासणी मोहीम

न्हावी, navhi ता. यावल (वार्ताहर)

जिल्हास्तरावरून शालेय पोषण आहाराबाबत School nutrition diet शाळा तपासणीचे School inspection कोणतेही आदेश नसतांना In the absence of orders काही अधिकारी शाळांची तपासणी करत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे.शासनाच्या आदेशानुसार यावल तालुक्यामध्ये ज्या गावांमध्ये एक महिन्यापासून कोरोना चा एकही रुग्ण नाही अशा गावांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने व नियुक्त केलेल्या समितीने ठराव करून दिनांक 15 जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग कोरोनाचे नियम पाळून सुरू केलेले आहेत . अशा मोजक्याच माध्यमिक शाळा यावल तालुक्यात सुरू आहे .

मात्र एकही प्राथमिक शाळा सुरू नाही. असे असतांना यावल तालुक्यात शिक्षण विभागाचे कायही अधिकारी आदेश नसतांनाहीे शाळांची तपासणी करीत आहे. जिल्ह्यातील इतर कोणत्याही तालुक्यात शाळा तपासणी केली जात नाही.

याबाबत अधिक माहिती घेतलली असता जिल्ह्यात शाळा तपासणीचे आदेश कुठल्याही प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिलेले नसल्याचे सांगण्यात आले. असे असून सुद्धा तालुक्यात शिक्षण विभागाचा काही अधिकारी शाळा-शाळांमध्ये फिरत असून पोषण आहाराबाबत शाळा तपासणी करत आहेत. यात मुख्याध्यापकांना त्रास देऊन त्यांची पिळवणूक करीत आहे.

काही मुख्याध्यापकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की संबंधित अधिकारी शाळेमध्ये येऊन शाळा तपासणी करायची असल्याचे सांगून विविध प्रकारचे प्रश्न विचारत असतात. शासनाच्या नियमानुसार करोनाचे नियम पाळून मुख्याध्यापक व शिक्षक यांनी जीव मुठीत धरून शाळा नुकत्याच सुरू केलेल्या आहे . शाळा तपासणी चे असे कुठलेही आदेश तालुकास्तरावर मिळालेले नसताना तपासणी करणे चुकीचेच आहे.

तालुक्यातील विविध संघटनेच्या अध्यक्षांना विचारले असता असा प्रकार तालुक्यात असल्यास मुख्याध्यापक यांनी संघटनेकडे लेखी तक्रार करावी असे सांगण्यात आले. मात्र कोणताही मुख्याध्यापक अशी लेखी तक्रार करणार नाही. कारण त्यांना याच शिक्षण विभागाशी नेहमी काम पडत असते. म्हणून मुख्याध्यापक लेखी तक्रार करत नाहीत. कारण हेच अधिकारी पुढे मुख्याध्यापक आणि शाळेला अडचणीत आणण्याची भिती आहे.

जिल्हास्तरावरून शालेय पोषण आहार तपासणी चे कोणत्याही प्रकारचे आदेश तालुकास्तरावर आतापर्यंत देण्यात आलेले नाहीत. नईम शेख , गटशिक्षणाधिकारी, यावल.

- Advertisment -

ताज्या बातम्या