Wednesday, April 8, 2026
HomeनगरAhilyanagar : दर वाढले, पण संचालक कार्यालय दाळ शिजू देईना

Ahilyanagar : दर वाढले, पण संचालक कार्यालय दाळ शिजू देईना

पोषण आहाराच्या वाढीव दराबाबत जिल्हा परिषदेसमोर पेच

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शालेय पोषण आहार योजनेतील प्रति विद्यार्थी खर्चात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला. तसेच हा सुधारित दर 1 मे 2025 पासून लागू करण्याचे आदेश काढले. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अधिक पौष्टिक आहार मिळण्यास मदत होणार होती. मात्र, शिक्षण संचालकाकडून सरकारच्या सुधारित दराऐवजी जुन्याच दराने पोषण आहाराचे काम सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील पोषण आहार विभागात पेचात सापडले आहे.

- Advertisement -

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतून इयत्ता पहिली ते पाचवी या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त, तसेच सहावी ते आठवीमधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन, प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी 100 ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी 150 ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो. आता केंद्र शासनाने प्रतिदिन, प्रति लाथार्थी आहार खर्चाच्या दरात वाढ करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 4 मार्च 2025 च्या शासन निर्णयान्वये प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी 6.19 रुपये व उच्च प्राथमिक वर्गासाठी 9.29 रुपये निश्चित करण्यात आली होती.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आहार खर्चाच्या दरास मान्यता मिळाली आहे. 1 मेपासून सुधारित दरानुसार पैसे मिळणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने 12 जून रोजी काढला. मात्र, त्यानंतर शिक्षण संचालक यांच्यावतीने नवीन दराऐवजी जुन्याच दराने पोषण आहाराचे काम सुरू ठेवण्यात यावेत, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील पोषण आहार यंत्रणा पेचात सापडली आहे. याबाबत पुन्हा शिक्षण संचालक कार्यालयाशी पत्रव्यव्हार करून याबाबत माहिती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

6 रुपये 78 पैसे ते 10 रुपये 17 पैसे वाढ
नव्या शासन निर्णयानुसार प्रतिदिन, प्रति लाभार्थी आहार खर्च प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी 6.78 रुपये, तर उच्च प्राथमिक लाभार्थी गटासाठी 10.17 रुपये एवढे दर निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी शाळेत पोषण आहार शिजविण्यासाठी अनेकवेळा निधीअभावी शिक्षकांनाच तेल-मिठाचा खर्च करावा लागायचा. आता शिक्षकांना स्वतःच्या खिशातून करावा लागणारा खर्च वाचण्यास मदत मिळणार आहे.

4 लाख 46 हजार 788 विद्यार्थ्यांना फायदा
नगर जिल्ह्यात 4 हजार 537 शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना राबवण्यात येते. यात पहिली ते पाचवीपर्यंत 2 लाख 71 हजार 97 विद्यार्थी व सहावी ते आठवीपर्यंतचे 1 लाख 75 हजार 691 विद्यार्थी अशा 4 लाख 46 हजार 788 विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येतो. पोषण आहारातील खर्चाचे दर वाढवल्याने या विद्यार्थ्यांना लाभ होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

Baramati By-Poll : “काँग्रेसने बारामती निवडणुकीतून माघार घेतली नाही, भाजप मुद्दाम…”;...

0
मुंबई । Mumbai बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे....