Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशशाळा, महाविद्यालये 15 ऑगस्टनंतर होणार सुरू

शाळा, महाविद्यालये 15 ऑगस्टनंतर होणार सुरू

सार्वमत

नवी दिल्ली – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बंद असलेली शाळा आणि महाविद्यालये 15 ऑगस्टनंतर सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी रविवारी सांगितले. ते वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

- Advertisement -

ते म्हणाले, जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत करोनाचा संसर्ग कमी झालेला असेल, असा विश्वास आहे. देशात सध्या करोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असले, तरी बरे होण्याचे प्रमाण त्यापेक्षाही जास्त आहे. करोनाचा धोका हळूहळू कमी होईल आणि सामान्य जनजीवन पूर्वपदावर येईल, 15 ऑगस्टनंतर देशभरातील शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यावर आमचा भर राहणार आहे. तथापि, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने जी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, त्यांचे काटेकोर पालनही केले जाईल. भौतिक दूरतेच्या नियमानुसारच विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था केली जाणार आहे,

तोपर्यंत सर्व निकाल जाहीर करू
शाळा आणि महाविद्यालयांचे सत्र सुरू करण्यापूर्वी सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येतील. त्या दिशेने प्रत्येकच राज्यातील शिक्षण संस्था आणि मंडळे कामाला लागली आहेत, असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या