Monday, May 6, 2024
Homeजळगावजिल्ह्यातील 18 कृषी दुकानांवर सीलची कारवाई

जिल्ह्यातील 18 कृषी दुकानांवर सीलची कारवाई

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात कृषी बियाणे आणि खते विक्री करण्यासंदर्भात कृषी दुकानदारांकडून शासनाच्या सूचनाचे पालन न करणार्‍या कृषी दुकानांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

- Advertisement -

गेल्या दोन महिन्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पथकाच्या झाडाझडतीत जिल्ह्यातील 18 कृषी दुकाने सील करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली.

पावसाळा तोंडावर असताना शेती मशागतीची कामे जोरात सुरु आहे. शेती मशागतीची कामे पूर्णत्वाकडे आल्यानंतर शेतकर्‍यांची कृषी दुकानांवर बियाणे व खतांची खरेदीसाठी गर्दी वाढू लागली. मात्र, कृषी केंद्रावर शेतकर्‍यांच्या हाताचे ठसे घेऊन बियाणे व खतांची विक्री करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांकडून देण्यात आल्या आहेत.

परंतु, काही कृषी केंदांकडून या नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पथकाने एप्रिल व मे महिन्यात राबविलेले मोहिमेत जिल्ह्यातील 18 कृषी केंद्रांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे. काही कृषी दुकानांचा 15 दिवस तर काहींचा महिन्याभरासाठी परवाना रद्द करण्यात आला आहे. तर अमळनेर येथील कृषी केंदांसह इतर चार दुकानांचा परवाना कायमस्वरुपी रद्द केल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

खतांची लिंकींग करणारे रडारवर

जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्यानंतर कृषी केंदांवर खतांची खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांची गर्दी होत असते. अशा गर्दीचा फायदा घेऊन कृषी केंद्रांकडून खंतांची लिंकींग करणारे कृषी केंद्रांवर करडी नजर राहणार असून खतांची लिंकिंग करुन शेतकर्‍यांची अडवणूक करणारे कृषी केंद्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पथकाच्या रडारवर आहेत.

शेतकर्‍यांनी सध्या पेरणी करु नये

जिल्ह्यात मान्सूनचा जोरदार पाऊस पडत नाही,तोपर्यंत शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करु नये. दमदार पाऊस झाल्यानंतर जमिनीत ओलसरपणा असल्याशिवाय पेरणी करु नये. सध्या जिल्ह्यात पाऊस सक्रीय झालेला नसल्याने पेरणी केलेल्या बियाणे व्यवस्थितरीत्या उगवण होत नसल्याने दुबार पेरणीचे संकट टाळावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या