Thursday, May 2, 2024
Homeजळगावदाणाबाजारात 17 दुकाने सील

दाणाबाजारात 17 दुकाने सील

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

दाणा बाजारासह फुले मार्केट परिसर, जुना कापड बाजार गल्ली व एम जी. रोड तसेच बळीराम पेठ परिसरात अतिक्रमणाची कारवाई मनपा अतिक्रमण विभागाने केली.

- Advertisement -

या कारवाईत 17 दुकाने सील करीत 8 ते 10 चहा, पानटपर्‍या, लोखंडी 20 ते 25 पेट्या, दुकानाचे साहित्य आदी जप्त करण्यात आले. उपायुक्त वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मनपा अतिक्रमण विभागाने अतिक्रमण कारवाईचा धडाका सुरूच ठेवत शुक्रवारीही फुले मार्केट परिसर तसेच जुना कापड बाजार परिसरात कारवाई करण्यात आली.

रस्त्यावर अडसर ठरणारे दुकानदारांचे साहित्य जप्त करण्यात आले. रस्त्यांवर ठिकठिकाणी असणारे खवैय्येंची हातगाड्या, साहित्य जप्त करण्यात आले.

फुले मार्केटच्या काही दुकानदारांनी दाणा बाजारात अगोदर असलेल्या जुना पेट्रोलपंपाजवळ काही लोखंडी पेट्या करुन त्यात साहित्य ठेवल्याचे आढळून आले अशा 20 ते 25 पेट्या जप्त करण्यात आल्या.

अनेक हॉकर्स तसेच दुकानदार हे वारंवार नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत असल्याने ही कारवाई करावी लागत असल्याचे उपायुक्त श्री. वाहुळे यांनी स्पष्ट केले.

दाणा बाजारात 17 दुकाने सील

दाणा बाजारात जवळपास 17 दुकाने सील करण्यात आली. या भागात अँटीबीसीएल लस देण्यासाठी कॅम्प आयोजित केला होता.

ही लस दुकानदार व दुकानातील कर्मचारी यांनी घेणे बंधनकारक होते याचा लाभ 70 टक्के दुकानदारांनीही घेतला होता.

मात्र काही दुकानदारांनी हलगर्जीपणा केला व लसीचा लाभ घेतला नसल्याने अशा 25 ते 30 टक्के दुकानदारांवर कारवाई करीत 17 दुकाने सील करण्यात आली.

तर अनेक दुकानदारांना समज देण्यात आली. तर काही दुकानदारांचे साहित्य जप्त करण्यात आले. दोनतीनदा बजावूनही हे दुकानदार सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करीत असल्याने या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.

तर काही दुकानदारांचे साहित्य अतिक्रमणात असल्याने त्यांचेवर कारवाई करण्यात आली. तसेच अनेक दुकानदार, कर्मचारी विनामास्क आढळल्याने कारवाई करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या