कोल्हार | वार्ताहर | Kolhar
ग्राहकांना (Customer) नाविन्यपूर्ण वित्तीय सेवा व सुविधा देण्यासाठी ख्यातीप्राप्त असलेल्या समता पतसंस्थेने आणखी एक पाऊल पुढे टाकले. कोल्हार बुद्रुक (Kolhar Budruk) येथील समता पतसंस्थेमध्ये सेल्फ बँकिंग (Banking) तसेच घरबसल्या ऑनलाईन मुदत ठेव सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे यांनी दिली. ग्राहकांना अशाप्रकारची आधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून देणारी संपूर्ण महाराष्ट्रातील (Maharashtra) ही बहुदा पहिलीच एकमेव संस्था असावी.
कोल्हार बुद्रुक येथे समता पतसंस्था गेल्या ४ वर्षांपासून कार्यरत आहे. संस्थेची (Sanstha) स्थापना कोपरगाव येथे ३९ वर्षांपूर्वी झाली. संस्थेने एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा एव्हाना पार केलेला आहे. कोल्हारच्या शाखेमध्ये ८ कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. नुकतेच समता पतसंस्थेच्या कोल्हार बुद्रुक येथील शाखेत सेल्फ बँकिंग, घरबसल्या ऑनलाईन मुदत ठेव सुविधा, मिस कॉल पेमेंट सुविधा, मिस कॉल बॅलन्स इन्क्वायरी सुविधांची सुरुवात ह. भ. प. नवनाथ महाराज म्हस्के यांच्याहस्ते करण्यात आली. यासोबत समता पतसंस्था ही संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक सोनेतारण कर्ज रक्कम देणारी संस्था आहे. एक तोळे सोन्याच्या दागिन्यावर अंदाजे ८२ हजार रक्कम कर्जदाराला येथे मिळू शकते. शिवाय हे गोल्ड लोन करण्याची सर्वात सोपी, सुलभ व जलद प्रक्रिया येथे आहे.
संस्थेचे स्वतःचे बँकिंग ॲप्लीकेशन असून याद्वारे एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस या नेटबँकिंग सुविधा उपलब्ध आहेत. विशेष बाब म्हणजे येथे पतसंस्थेतील (Patsanstha) ग्राहकाच्या सेव्हिंग खात्यामध्ये जमा रकमेवर डेली बेसिसवर तब्बल ८ टक्केपर्यंत व्याज देणारी ही एकमेव पतसंस्था आहे. सेव्हिंग खात्यामध्ये थेट ऑनलाइन रक्कम जमाही करता येते किंबहुना दुसऱ्या ग्राहकाकडून मागवताही येते. समता इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे तीन वर्षाच्या ठेवीवर ८ टक्के व्याजदर दिला जातो. प्रत्येक ठेवींना साधारणतः १० टक्क्यापर्यंत व्याजदर येथे मिळत असल्याची माहिती समता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे यांनी दैनिक सार्वमतशी बोलताना दिली.
दरम्यान, यावेळी कोल्हार शाखेचे सर व्यवस्थापक सचिन भट्टड, व्यवस्थापक व्यंकटेश वैष्णव, गोल्ड व्हॅल्यूअर केतन लोळगे, रोहित देडगावकर उपस्थित होते.





