Friday, May 3, 2024
HomeUncategorizedसेना खासदारांनी भाजपाच्या पाठिब्याशिवाय पुन्हा जिंकून दाखवावे

सेना खासदारांनी भाजपाच्या पाठिब्याशिवाय पुन्हा जिंकून दाखवावे

औरंगाबाद – Aurangabad

2019 च्या (Lok Sabha elections) लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नावावर निवडणुका लढल्याने शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. त्या खासदारांनी आता भाजपाविना निवडून येऊनच दाखवावे, असे ओपन चॅलेंज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी दिले आहे. 

- Advertisement -

शहरातील धावणी मोहल्ला भागात जगदीश सिद्ध या भाजपा पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी त्यांनी हे भाष्य केले. कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही हे सांगण्यासाठी उद्धवजीसारखा कंपाउंडर किंवा डॉक्टर नाही म्हणजेच उद्धवजी सारखा डॉक्टर आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांसारखा कंपाउंडर नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

कोरोनाची (corona) पहिली लाट ओसरल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत होते. पहिली लाट संपली असे वाटायला लागताच दोन-तीन महिन्यात दुसरी लाट आली आणि पुन्हा सगळे काही ठप्प झाले. शाळा-महाविद्यालये, रोजगार, उद्योगधंदे सगळं पुन्हा बंद झाले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दुसरी लाटदेखील ओसरली आहे. बंद झालेले राजकीय जीवन देखील पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे आता इतर व्यवहार पुन्हा सुरू करण्याशिवाय पर्याय नाही, असंही पाटील म्हणाले

देशभरात 65 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तरीही राज्य सरकार मात्र केंद्र सरकारला दोष देते. एकीकडे देशभरात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाल्याचा दावा करायचा आणि दुसरीकडे केंद्र सरकार लसीचा पुरवठा करत नाही, असा आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू असल्याचे पाटील म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या