Friday, July 12, 2024
Homeदेश विदेशपंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनात राजदंड स्थापित

पंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्या संसद भवनात राजदंड स्थापित

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

देशाला आज नवीन संसद भवन (New Parliament Building) मिळाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात पुजेने करण्यात आली…

IPL 2023 Final वर पावसाचे सावट, सामना रद्द झाल्यास कोण ठरेल विजेता?

यावेळी ऐतिहासिक आणि धार्मिक सेंगोल (Sengol) अर्थात राजदंडाची स्थापना पंतप्रधान मोदींनी केली. त्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंगोलची पूजा करून संतांसमोर आदरपूर्वक साष्टांग नमस्कार केला. यानंतर संतांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सेंगोलसह नवीन संसद भवनात प्रवेश केला. यावेळी नवीन इमारतीच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी संसद भवनात महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) पुष्पांजली अर्पण केली.

“संसद भवन लोकशाहीतलं मंदिर, त्याचा…”; सुप्रिया सुळेंनी सुनावलं

तर सकाळी साडेसातच्या सुमारास संसद भवन (Parliament House) संकुलात असलेल्या गांधी मूर्तीजवळ बांधलेल्या विशेष मंडपामध्ये पूजा आणि हवनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर तामिळनाडूच्या पुरोहितांनी पंतप्रधान मोदींना राजदंड सुपूर्द केला. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात प्रवेश करून सेंगोल म्हणजेच राजदंड लोकसभेच्या अध्यक्षांच्या खुर्चीच्या बाजूला वैदिक मंत्रोच्चारात स्थापित केला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

नव्या संसद भवनातील राजदंडाचे महत्त्व काय?

सातव्या शतकात एका तमिळ संताने या राजदंडाची निर्मिती केल्याचे सांगितले जाते.

अफाट साम्राज्यविस्तार करणाऱ्या चोल राजघराण्यात सत्तेचे हस्तांतरण या राजदंडाद्वारेच केले जायचे.

इंग्रजांकडून सत्ता सोडायचा क्षण आला तेव्हा हस्तांतर म्हणजे नेमकं काय करायचं असं लॉर्ड माऊंटबॅटन यांनी विचारलं. त्यावर नेहरुंनी सी राजगोपालचारी यांच्याशी सल्लामसलत केली.

राजगोपालचारी यांनी तामिळनाडूतल्या चोल साम्राज्यातल्या या जुन्या परंपरेची माहिती दिली होती.

त्यानुसार हा राजदंड १५ ऑगस्ट १९४७ च्या सत्ता हस्तांतरणावेळी वापरण्यात आला होता.

त्यानंतर हा राजदंड प्रयागराजच्या संग्रहालयात ठेवला गेला होता.

आता हा राजदंड नवीन संसद भवनात स्थापित करण्यात आला आहे.

संसदेत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीशेजारी हा राजदंड स्थापित करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या