Thursday, May 2, 2024
Homeनगरमराठा आरक्षण रद्द : 'विधिमंडळाचे विशेष आधिवेशन बोलवावे व तोडगा काढावा'

मराठा आरक्षण रद्द : ‘विधिमंडळाचे विशेष आधिवेशन बोलवावे व तोडगा काढावा’

अकोले l प्रतिनिधी

आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्याबाबत आज माजी आदिवासी विकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

‘मराठा आरक्षण प्रश्नी सुप्रीम कोर्टाने आज झिडकारले आहे. यामूळे मला धक्का बसला. आज हा निकाल ऐकुन अत्यंंत वाईट वाटले आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केली असून आपला मराठा समाजाच्या आरक्षणास सदैव पाठींबा राहील असेही ते म्हणाले.

मराठा आरक्षण रद्द : मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – आ.विखे

पिचड बोलतांना म्हणाले की, ‘मराठा समाजासाठी राणे समितीत मी स्वत: काम केलेला माणुस आहे. महाराष्ट्रात कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात प्रत्यक्ष जाऊन मराठा समाजाचे अवलोकन करण्याचे भाग्य मला लाभले. मराठा समाजातील सर्वच जन श्रीमंत नाहीत. मोलमजुरी करणे, मुंबईत माथाडी काम करणे, डोक्यावर ओझं उचलतातअशी कामें ते करत आहेत. त्यांना मुंबईत स्वत:चे घर नाही. म्हणून ते मिळेल त्या झोपडीत राहतात. मी त्यांना झोपडीत राहताना स्वत: पहिले आहे. मराठा समाजातील अनेक कुटुंंब यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ही अवस्था गायकवाड समितीने पाहिली आहे.’ असं त्यांनी म्हंटल आहे.

तसेच, ‘मराठा समाजाला आरक्षण देण्याची भुमिका फडनवीस सरकारने घेतली होती. दुर्दैवाने मराठा समाजाच्या विरोधी निकाल गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने करोना व मराठा समाजाच्या आरक्षण संबधी विचार करण्यासाठी विधीमंडळाचे विशेष आधिवेशन बोलवावे व सर्वच पक्षांच्या समितीने या प्रश्नी तोड्गा काढावा. अशी अपेक्षाही माजी मंत्री पिचड यांनी बोलून दाखविली.

- Advertisment -

ताज्या बातम्या