Sunday, April 27, 2025
Homeक्राईमधक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची पत्नी आणि दोन मुलांसह विष प्राशन करुन आत्महत्या

धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची पत्नी आणि दोन मुलांसह विष प्राशन करुन आत्महत्या

नवी दिल्ली | New Delhi

काँग्रेसच्या (Congress) एका ज्येष्ठ नेत्याने त्याच्या कुटुंबासह विष (Poison) पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या ज्येष्ठ नेत्याने पत्नी आणि दोन मुलांसह विष खाल्लं होतं. त्यानंतर या चौघांना पुढील उपचारासाठी बिलासपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र, उपचारादरम्यानच या चौघांचाही मृत्यू (Death) झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Weather Update : राज्यभरात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पंचराम यादव (वय ६५, रा. कोतवाली, जांजगीर क्षेत्र वार्ड क्रमांक १०) असे विष पिऊन आत्महत्या केलेल्या काँग्रेस नेत्याचे नाव असून त्यांनी पत्नीसह आणि दोन मुलांसह विष खाल्लं. ते छत्तीसगढमधील (Chhattisgarh) चांपा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तर पोलीस अधीक्षक राजेंद्र जयस्वाल माहिती देतांना म्हणाले की, पंचराम यादव यांनी त्यांची पत्नी नांदणी यादव (वय ५५), मुलगा सूरज यादव (वय २७) आणि निरज यादव (वय ३२) यांच्यासमवेत विष प्राशन केले.

हे देखील वाचा : Nashik News : महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

त्यानंतर चौघांनाही जिल्हा रुग्णालयात (District Hospital) दाखल करण्यात आले होते. यानंतर या चौघांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना बिलासपूर (Bilaspur) येथे हलवण्यात आले होते. सिम्स रुग्णालयात निरज यादव याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इतर तिघांना हलवण्यात आले होते. दरम्यान ३१ ऑगस्ट रोजी इतर तिघांचाही मृत्यू झाला.

हे देखील वाचा : आमदार खोसकरांना उमेदवारी कायम राखण्यासाठी आतापासूनच करावी लागतेय नेत्यांची मनधरणी

पंचराम यादव यांच्यावर होतं ४० लाखांचे कर्ज

मिळालेल्या माहितीनुसार, पंचराम यादव कंत्राटदार म्हणून काम करत होते. त्यांनी दोन बँकांकडून ४० लाखांचे कर्ज घेतले होते. शिवाय त्यांना हृदयाशी निगडीत आजारही होता.तसेच पंचराम यादव यांच्या पत्नी कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांचा मुलगा निरज यादव खासगी कंपनीत नोकरी करत होता. तर दुसरा मुलगा वडिलांप्रमाणे कंत्राट घेत होता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...