Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSitaram Yechury : माकपचे ज्येष्ठ नेते सिताराम येचुरी यांचे निधन

Sitaram Yechury : माकपचे ज्येष्ठ नेते सिताराम येचुरी यांचे निधन

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

माकपचे ज्येष्ठ नेते सिताराम येचुरी (Sitaram Yechury) (७२) यांचे निधन (Passed Away) झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. १९ ऑगस्ट रोजी त्यांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

हे देखील वाचा : Sharad Pawar : “मी झेड प्लस सुरक्षा घेईन, पण…”; शरद पवारांनी केंद्र सरकारला पत्र लिहित ठेवल्या ‘या’ अटी

२०१५ साली ज्येष्ठ दिवंगत नेते प्रकाश करात यांच्यानंतर सीताराम येचुरी यांची पहिल्यांदाच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर २०१८ आणि २०२२ साली त्यांना दोन वेळा या पदावर राहण्याची संधी मिळाली. डाव्या पक्षातील निर्णय प्रक्रियेत सरचिटणीस हे सर्वोच्च पद मानले जाते.

हे देखील वाचा : Kavita Raut : ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत सरकारी नोकरी मिळूनही नाराज; नेमकं कारण काय?

सीताराम येचुरी यांचा जन्म १२ ऑगस्ट १९५२ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण हैदराबाद येथे झाले आणि त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्रातील पदवी प्राप्त केली. पुढे, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) त्यांनी अर्थशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतले, जिथे त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात झाली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : अवैध गर्भपात प्रकरण; सत्तर वर्षीय डॉक्टरची सखोल चौकशी

दरम्यान, १९७० च्या दशकात, विद्यार्थीदशेतच येचुरी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या ‘स्टूडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया’ (SFI) या विद्यार्थी संघटनेत सामील झाले. कालांतराने ते SFI चे प्रमुख नेते बनले आणि या संघटनेचे अध्यक्षही झाले. १९८४ साली येचुरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य बनले. १९९२ साली त्यांची पक्षाच्या पॉलिटब्युरोमध्ये नियुक्ती झाली. पक्षाचे मुखपत्र असलेल्या “पीपल्स डेमोक्रसी”चे अनेक वर्ष संपादकपदही त्यांनी भूषविले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या