Monday, October 14, 2024
HomeनाशिकNashik Crime News : अवैध गर्भपात प्रकरण; सत्तर वर्षीय डॉक्टरची सखोल चौकशी

Nashik Crime News : अवैध गर्भपात प्रकरण; सत्तर वर्षीय डॉक्टरची सखोल चौकशी

'मिसोप्रोस्टॉल' चे किट लपवले

नाशिक | Nashik

उच्चभ्रू परिसर असलेल्या महात्मानगरातील एका हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपाताचे (Illegal Abortion) केंद्र सुरु असल्याचे उघड झाल्यावर अखेर पोलिसांनी (Police) सखोल तपास सुरु केला आहे. त्यात अनेक गंभीर बाबी उघड झाल्या असून ७० वर्षीय संशयित डॉक्टर आर. एन. पंड्या यांनी सन २००१ पासून हॉस्पिटल सुरु करुन अवैधरित्या हजारो गर्भपात केल्याचे समोर येते आहे. विशेष म्हणजे पंड्या यांनी बंदी असलेल्या ‘मिसोप्रोस्टॉल’ या गर्भपाताच्या गोळ्या ‘हिस्टाकेम’ या अॅलर्जी व सर्दीच्या गोळ्यांच्या पाकिटात लपवून ठेवल्याचे समोर आले आहे. हे हॉस्पिटल सील करुन गर्भपातासाठी ठेवलेली जप्त सामग्री महापालिकेने गंगापूर पोलिसांकडे हस्तांतरित केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक

गंगापूर रोडवरील (Gangapur Road) महात्मानगर येथे गेल्या २०-२५ वर्षांपासून एक हॉस्पिटल आहे. त्यात अवैधपणे गर्भपात केंद्र सुरु असल्याची माहिती महानगरपालिकेचे (NMC) वैद्यकिय अधिकारी डॉ.तानाजी चव्हाण यांनी समजली होती. त्यानुसार मनपाच्या आरोग्य पथकाने सोमवारी (दि.९) अचानक छापा टाकून कारवाई केली. त्यावेळी हॉस्पिटलमधून गर्भपाताची औषधे, गोळ्या व अन्य साहित्य आढळून आले. त्यानुसार डॉ. पंड्या यांच्यावर भा. दं. वि कलम ४२०, ४६५, ४६८ सह महाराष्ट्र बाँम्बे नर्सिंग होम अँक्ट १९४९ चे कलम तीन व वैद्यकीय गर्भपात अधिनियम कलमान्वये गुन्हा नोंद झाला आहे.

हे देखील वाचा : Nashik Traffic Route Change : सोमवारपर्यंत अनेक मार्गांत बदल; कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना

दरम्यान, पंड्या यांचे नियत वय ७० असून अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. तर, गंगापूर पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी डॉ. पंड्या यांच्याकडे सखोल चौकशी सुरु केली आहे. सध्या तरी त्यांना अटक होण्याची शक्यता कमी असून अधिक चौकशीत काय निष्पन्न होते, त्यावर त्यांची अटक (Arrested) अवलंबून आहे.

हे देखील वाचा : नाफेड कांदा घोटाळ्याची चौकशी; पंतप्रधान कार्यालयाकडून तक्रारीची दखल

कीट तपासणीसाठी एफडीएकडे

पंड्याच्या कन्सल्टींग रुममधील ड्रॉवर आणि ऑपरेशन थिएटरमध्ये मिसोप्रोस्टॉल गोळ्यांचे प्रत्येकी एक किट, कपाटात भूल देण्यासाठीचे केटामाईन १० एमएलच्या व्हायल, सर्दी, पडस्याच्या उपचारासाठी लागणारे हिस्टाकेम गोळ्यांच्या पाकिटात लपविलेल्या गर्भपाताच्या ‘गेस्टाप्रो’ नावाचे १८ कॉम्बीपॅक किट. यातील आठ किट तपासणीसाठी एफडीएकडे पाठविण्यात आल्या आहेत.

१४ दिवस ते ५ महिन्यांच्या जीवांचे गर्भपात

पंड्या यांच्या हॉस्पिटलमध्ये काही संशयास्पद कागदपत्रे आढळली असून त्यात हजारो प्रसूती केल्याचे उघड झाले आहे. शेकडो गर्भवतींसह काही तरुणींचाही गर्भपात झाल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. साधारण १४ दिवसांपासून ५ ते ६ महिन्यांपर्यंत वाढ झालेल्या नवजात अर्भकांचे गर्भपात केल्याचे समोर आले आहे. यात सर्वांत जास्त गर्भपात हे स्री जातीचे झाले आहेत का, याचा तपास पोलिसांनी सुरु केला असून हॉस्पिटलमधील स्टाफची चौकशी होणार आहे. नेमके किती गर्भपात झाले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तपास वरिष्ठ निरीक्षक सुशील जुमडे यांच्या सूचनेने सहायक निरीक्षक नितीन पवार करत आहेत.

ठळक मुद्दे

१) मनपाकडे या हॉस्पिटलची नोंदच नाही
२) हॉस्पिटलकडे एमएनएचएचा नूतनीकरण परवाना नाही
३) रूग्णांची नोंदवही नाही
४) निष्काळजीपणे जैविक कचरा संकलन केला
५) गर्भपाताच्या गोळ्या बाळगून अवैध गर्भपात केंद्र चालविले
६) नाशिक मनपाचे हॉस्पिटल रजिस्ट्रेशन बनावट पद्धतीने बनवले
७) रुग्णांची व नाशिक महानगरपालिकेची फसवणूक केली

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या