Monday, October 14, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar : "मी झेड प्लस सुरक्षा घेईन, पण..."; शरद पवारांनी केंद्र...

Sharad Pawar : “मी झेड प्लस सुरक्षा घेईन, पण…”; शरद पवारांनी केंद्र सरकारला पत्र लिहित ठेवल्या ‘या’ अटी

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा दिल्यानंतर नवा वाद उभा राहिला होता. विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha Election) तोंडावर ही सुरक्षा दिल्याने माझी हेरगिरी करण्याचा प्रयत्न आहे का? अशी शंका शरद पवार यांनी उपस्थित केली होती. तसेच ही केंद्रीय सुरक्षा शरद पवार यांनी नाकारल्याचेही सांगण्यात येत होते. अशातच आता सुरक्षा घेण्याआधी शरद पवार यांनी केंद्र सरकारला पत्र लिहित काही अटी ठेवल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : शरद पवारांच्या विश्वासू नेत्याने घेतली भुजबळांची भेट; दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नुकतीच शरद पवार यांच्या प्रतिनिधीची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत (Delhi) बैठक झाली. यावेळी शरद पवारांतर्फे काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारकडून शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा (Z Plus Security) देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मी स्वत: आधी मला कोणत्या प्रकाराचा धोका आहे का, ते पडताळून पाहीन, त्यानंतर झेड प्लस सुरक्षा घ्यायची की नाही यावर निर्णय घेईन, असे पवार म्हणाले होते.

हे देखील वाचा : Nashik Traffic Route Change : सोमवारपर्यंत अनेक मार्गांत बदल; कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना

यानंतर आता या बैठकीनंतर शरद पवार यांच्याकडून काही अटींचे पत्र केंद्र सरकारला (Central Government) पाठवण्यात आले आहे, त्या मान्य झाल्यानंतरच सुरक्षा घेण्यात येईल, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे.या अटींमध्ये केंद्राच्या सुरक्षेआधी राज्याचे सुरक्षा कर्मचारी माझ्यासोबत असणार अशी पहिली अट शरद पवारांनी ठेवली आहे. तसेच कार्यालयात आणि निवासस्थानाच्या आत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसेल. याशिवाय स्वतःच्या खाजगी वाहनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसेल, यासह काही अटी शर्थींचे पत्र शरद पवारांकडून केंद्राला सादर करण्यात आले आहे. या अटी (Conditions) मान्य केल्यावर पवारांकडून केंद्राची सुरक्षा घेण्याचा विचार केला जाणार आहे.

हे देखील वाचा : Nashik News : गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलादचा उत्सव; मिरवणूक मार्गावर असणार ‘इतक्या’ सीसीटीव्हींची करडी नजर

दरम्यान, २१ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने देशातील तीन प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केली होती. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत आणि शरद पवार यांच्या नावाचा समावेश होता. मात्र, शरद पवारांनी सुरक्षा नाकारली होती. ही एक प्रकारची गुप्तहेरगिरी करण्याची पद्धत असल्याचे सांगत शरद पवारांनी केंद्रास नकार दिला होता. त्यानंतर आता पवारांनी सरकारला ही सुरक्षा स्वीकारण्याबाबत काही अटींचे पत्र पाठविले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या