Sunday, May 19, 2024
Homeनगरज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे निधन

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे निधन

पुणे |प्रतिनिधी| Pune

मूळ संगमनेरकर ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृद्धापकाळाने पुण्यात राहत्या घरी आज (14 सप्टेंबर 2022) दुपारी 12.30 वाजता निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. ‘गुलाबमावशी संगमनेरकर’अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात दोन मुली,नातवंडे,जावई असा परिवार आहे.

- Advertisement -

काही वर्षांपूर्वीच त्यांच्या मुलाचे निधन झाले होते. त्यांचा मुलगा त्यांची लावणी परंपरा पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका साकारत होता. आता त्यांची मुलगी लावणीसम्राज्ञी वर्षा संगमनेरकर आईची लावणी परंपरा पुढे नेत आहेत. गुलाब बाईंच्या आकस्मित निधनानं लोककलेच्या क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

लावणी क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व, महाराष्ट्र शासनाच्या विठाबाई नारायणगाकर जीवनगौरव पुरस्कार विजेत्या व आपली जन्मभूमी संगमनेरचे नावं आयुष्यभर अभिमानाने मिरवणारी ज्येष्ठ कलावंती मगुलाबमावशी संगमनेरकरफ म्हणून ओळखायचे. वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांच्या घरात लावणी परंपरा असल्या कारणाने त्यांना लहानपणापासूनच लावणीची गोडी लागली. त्या महाराष्ट्रातील लोकप्रिय कलावंत होत्या. त्या बैठकीच्या लावणीसाठी ओळखल्या जायच्या. त्यांनी फडाच्या तमाशात देखील काम केले असून रज्जो या चित्रपटात काम केले .त्या हुरहुन्नरी कलाकार होत्या. त्यांना लावणी क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व, महाराष्ट्र शासनाच्या विठाबाई नारायणगाकर जीवनगौरव पुरस्कार विजेत्या होत्या.लावणी क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व, महाराष्ट्र शासनाच्या विठाबाई नारायणगाकर जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते.

तमाशा कलेची मोठी हानी – ना. विखे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तमाशा कलेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणार्या जेष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांच्या निधनाने तमाशा कलेची मोठी हानी झाली असून,शेवटच्या श्वासापर्यंत कलेची जोपासना करणारा कलावंत गमावल्याचे दुख महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

अतिशय खडतर परीस्थीतीला सामोरे जात गुलाबबाई संगमनेरकर यांनी तमाशा कलेला जिवंत ठेवण्याचे काम केले.त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण या कलेसाठी वाहीला होता.येणार्‍या संकटावर मात करून महाराष्ट्राच्या कलेची जोपासना केल्यानेच तमाशा कलेचा गौरव सातत्याने होत राहील्याची भावना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त करून श्रध्दांजली अर्पण केली.

लोककलेतील सुवर्णपान हरपले – आ. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

मूळच्या संगमनेर च्या रहिवासी असलेल्या गुलाबबाई संगमनेरकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे लावणी व लोककलेची सेवा करण्यासाठी वेचले. महाराष्ट्र शासनाचा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार मिळालेल्या या ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने लोककलेची एक सुवर्णपान हरपले असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे

गुलाब बाई यांनी आयुष्यभर तमाशा व लोककलेची सेवा केली. संगमनेर हे त्यांचे मुळगाव. अनेक लावण्यांवर आपल्या अदाकारीने त्यांनी महाराष्ट्रातील रसिकांच्या हृदयावर राज्य केले. आपली जन्मभूमी असलेल्या संगमनेरचे नाव त्यांनी आयुष्यभर अभिमानाने मिरवले. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांचे वृद्धपकाळाने निधन झाले असून त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील ज्येष्ठ लोककलावंतासह लोककलेतील एक सुवर्णपान हरपले असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

संगमनेरच्या सांस्कृतिक क्षेत्राची हानी – आ. डॉ. तांबे

ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले असून आयुष्यभर संगमनेरकर हे नाव त्यांनी आपल्या नावाला जोडले. लोककलेच्या माध्यमातून जनजागृतीसह त्यांनी जनतेची सेवा केली. त्यांच्या निधनाने संगमनेरच्या संस्कृती क्षेत्रातील एक मोठे व्यक्तिमत्व हरपले असल्याची भावना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या