Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशबायडेन इफेक्ट! शेअर बाजाराची ऐतिहासिक भरारी

बायडेन इफेक्ट! शेअर बाजाराची ऐतिहासिक भरारी

मुंबई | Mumbai

- Advertisement -

अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून डेमोक्रॅट नेते ज्यो बायडेन यांनी बुधवारी शपथ घेतली. तर, भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीही पदाची शपथ घेत त्या देशाच्या पहिल्या महिला उपाध्यक्षा होण्याचा मान मिळवला. याचाच परिणाम आज भारतीय शेअर बाजारात दिसून आला आहे.

मुंबई शेअर बाजाराचा (BSE) सेन्सेक्सने इतिहासात पहिल्यांदाच ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज (गुरुवार) व्यवहार सुरु झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच शेअर बाजाराने उसळी खात ५० हजारांचा टप्पा ओलांडला. ४० हजारांवरुन ५० हजारांपर्यंतचा टप्पा ओलांडण्यासाठी बीएसईला तीन महिन्यांचा कालावधी लागला. विशेष म्हणजे अवघ्या नऊ सत्रांमध्ये सेन्सेक्सने एक हजार अंकाची उसळी घेतली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४,७०० पर्यंत उंचावला. शेअर बाजाराने ५० हजारांचा टप्पा ओलांडला असला तरी या क्षेत्रातील जाणकारांनुसार येणाऱ्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारात मोठे चढ-उतार पहायला मिळू शकतात.

याआधी बुधवारी सेन्सेक्स ३९३ आणि निफ्टी १२३ अंकांनी वधारला होता. मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८३४ अंकांच्या वाढीसह ४९३९८ अंकावर स्थिरावला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २३९ अंकांच्या वाढीसह १४५२१ अंकावर स्थिरावला. बुधवारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी किमान तीन लोक कोटींची कमाई केली होती.

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांनी बुधवारी सूत्रे हाती घेतली. यानंतर आर्थिक पॅकेजला गती मिळण्याची शक्यता आहे. फेडरल रिझर्व्हच्या माजी अध्यक्ष जेनेट येलन यांची ट्रेझरी सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली आहे. येलन यांनी यापूर्वीच करोना रोखण्यासाठी मोठ्या आर्थिक पॅकेजचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बाजारात गुंतवणुकीचा ओघ वाढला असल्याचे फेडरल रिझर्व्ह आगामी पतधोरणात काय भूमिका घेते याकडे गुंतवणूकदारांची उत्सुकता लागली आहे.जो बायडन यांच्या हाती सत्ता आल्यानंतर अमेरिकेतील भांडवली बाजारात जल्लोष दिसून आला. बुधवारी अमेरिकेतील सर्वच शेअर बाजार तेजीसह बंद झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या