Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशअर्थसंकल्पाआधी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ

अर्थसंकल्पाआधी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ

मुंबई | Mumbai

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitaraman) आज सकाळी 11 वाजता 2022 चा अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात सरकार आर्थिक विकासाला (Financial Growth) चालना देण्यासाठी काही मोठ्या घोषणा करू शकते. दरम्यान, अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधी शेअर बाजारात तेजी दिसून आली आहे.

- Advertisement -

Budget 2022 : आजचा अर्थसंकल्प मोबाइलवर वाचता येणार… काय आहे प्रक्रिया?

आज मंगळवारी शेअर बाजारात मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स ७०० अंकांनी तर निफ्टी २०० अंकांनी वाढला आहे. या तेजीने गुंतवणूकदारांनी दोन लाख कोटींची कमाई केली आहे.

मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर ३० पैकी २९ शेअर तेजीत आहे. बँका, वित्त संस्था, वाहन उद्योग, आयटी , स्थावर मालमत्ता, धातू या क्षेत्रात खरेदीचा ओघ सुरु आहे. इन्फोसिस, रिलायन्स, एसबीआय, टाटा स्टील, बजाज फायनान्स, विप्रो, टेक महिंद्रा, आयटीसी, एचयूएल या शेअरमध्ये वाढ झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या