Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रसीरममधील अहवाल येईपर्यंत निष्कर्ष काढणे चुकीचे

सीरममधील अहवाल येईपर्यंत निष्कर्ष काढणे चुकीचे

पुणे l Pune

करोनावर लस तयार करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटला आग लागली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सीरमच्या ज्या इमारतीला आग लागली त्याची पाहणी केली.

- Advertisement -

त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना कोविशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहती दिली. शिवाय, सीरममधील आगीचा लसीकरणावर कोणताही परिणाम होणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आशेचा किरण लस बनवणाऱ्या केंद्रात आग लागली आमि सर्वांच्याच काळजाचा ठेका चुकला. दुर्दैवाने पाच जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने कोव्हिशिल्ड लस सुरक्षित आहे. आग लागली तेथील दोन मजले वापरात होते. वरील ठिकाणी जिथं केंद्र सुरु होणार होतं तिथे आग लागली. सर्वांना जी एक शंका आणि भीती वाटत होती. मात्र करोना लसीला कोणताही फटका बसलेला नाही, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

आगीची सखोलपणे चौकशी केली जात आहे. अहवाल येत नाही तोवर निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. पत्रकार परिषदेत सीरमचे सीईओ अदर पूनावालादेखील उपस्थित होते. आगीत एक हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. बीसीजीसह इतर औषधांच्या साठ्यावर परिणाम झाला असून आमचे जे नवे प्रोडक्ट्स येणार होते त्यांच्यावरही प्रभाव पडल्याचं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, करोना प्रतिबंधक लस ‘कोविशिल्ड’ची निर्मिती करणाऱया पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या मांजरी येथील एका इमारतीला भीषण आग लागली होती. या आगडोंबामध्ये 5 कंत्राटी कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीने प्रयत्न केले आणि दोन तासांत आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोविशिल्ड लसनिर्मिती प्लांट पूर्णपणे सुरक्षित आहे. आग कशामुळे लागली याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठी लसनिर्मिती कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिटय़ुट ऑफ इंडियाचे हडपसर आणि मांजरी येथे विविध लसींच्या निर्मितीचे प्रकल्प आहेत. मांजरीतील प्रकल्प शंभर एकरावर आहे. दुपारी 2.45 च्या सुमारास एसईझेड-3 इमारतीच्या पाचव्या मजल्याला आग लागली आणि काही मिनिटांत आगीने रौद्ररूप घेतले. धुराचे प्रचंड लोट पसरले. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे शंभरावर जवान, 15 बंब, पाण्याचे टँकर्स घेऊन घटनास्थळी धावले. दोन तास शर्थीने प्रयत्न केले. त्यानंतर आग आटोक्यात आली. आग आटोक्यात आल्यानंतर पुन्हा भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन रात्री उशिरापर्यंत येथे कुलीन ऑपरेशन सुरू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या