Wednesday, May 8, 2024
Homeदेश विदेशबिहारमध्ये भीषण स्फोट; सात जणांचा मृत्यू, अनेक घरे उद्ध्वस्त

बिहारमध्ये भीषण स्फोट; सात जणांचा मृत्यू, अनेक घरे उद्ध्वस्त

बिहार | Bihar

येथील भागलपूर जिल्ह्यात (Bhagalpur District) आज पहाटे तातारपूर पोलीस ठाण्याच्या (Tatarpur Police Station) हद्दीत भीषण स्फोट (Blast) झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात सात जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते…

- Advertisement -

यात अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटात अनेक घरांचे नुकसान झाले आहे. स्फोट झालेल्या ठिकाणचे कुटुंबीय फटाके बनवत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

स्फोट होताच पोलीस (Police) आणि अग्निशमन दल (Fire brigade) घटनास्थळी दाखल झाले. स्फोटानंतर येथील घरे संपूर्ण उद्ध्वस्त झाले आहेत. ढिगाऱ्याखालून सात जणांचे मृतदेह काढण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या