Thursday, May 2, 2024
Homeधुळेदोंडाईचा परिसरातील 12 गावांना भीषण पाणीटंचाई,

दोंडाईचा परिसरातील 12 गावांना भीषण पाणीटंचाई,

दोंडाईचा Dondaicha । प्रतिनिधी

दोंडाईचा परिसरातील (Dondaicha area) सुमारे 12 गावांना ऑगष्ट महिना लोटल्यानंतरही भीषण पाणीटंचाईचा (Severe water shortage ) सामना करावा लागत आहे. कर्ले ता.शिंदखेडा या गावाला (Karle village) तर आजूबाजूच्या परिसरातील पाच विहिरीवरून पाणीपुरवठा (Water supply from well) करण्यात येत आहे. त्यानंतरही गावाला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.

- Advertisement -

कर्ले, परसुळे, मांडळ, विखरण, चुडाणे, खर्दे, अंजनविहीरे, चौगांव बु., चौगांव खु, सोनशेलू, सुराय, वरझडी आदी गावांतील पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींची पातळी खालावली आहे. विहिरींमध्ये अद्यापही पाणी आलेले नाही. कारण या गावांमध्ये सलग दोन वर्षांपासून पर्जन्यमान अत्यंत कमी झाल्याने ही गंभीर स्थिती उद्भवली आहे. दरम्यान, अशातच ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आलेले विहिर अधिग्रहण मात्र बंद करण्यात यावे अशा आशयाचे पत्र तहसिलदार यांनी दिल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाटयावर आला आहे.

कर्ले ता. शिंदखेडा या गावाला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींच्या वर एक पाझर तलाव असून गेल्या वर्षी हा तलाव कोरडा होता. यावर्षी देखील तीन महिने लोटल्यानंतर देखील त्यात जलसाठा शुन्य टक्के आहे. त्यामुळे विहिरींना पाणी आलेले नाही. याठिकाणी जून, जुलै आणि ऑगष्ट या तीन महिन्यात केवळ रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे ते पाणी केवळ जमिनीत मुरले, शासन दरबारी पावसाची जी नोंद होते. त्यात सर्कल निहाय पाऊस मोजला जातो. परंतू शेवाडे सर्कलमध्ये कर्ले, परसुळे या गावांना इतर गावांप्रमाणे पावसाचे प्रमाण नसतांना देखील शासनाच्या दरबारी चांगला पाऊस झाल्याची नोंद आहे. यामुळे विहीर अधिग्रहण बंद करण्याबाबत तहसिलदारांकडून आदेश आले आहेत. पण प्रत्यक्षात गावात जावून ही परीस्थिती पाहिली तर निश्चितच वेगळे चित्र दिसत आहे.

दरम्यान, बुराई नदीचे पावसाळयात वाहून जाणार्‍या पाण्यातून सतारे, कर्ले, चुडाणे, सुराय आदी गावांना लाभ होण्यासाठी सतमाने येथील बुराई नदीतून एक्सप्रेस कॅनाल किंवा नैसर्गिक उताराने दीड कोटीचा निधी खर्च केल्यानंतर पाणीप्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. त्यासाठी कर्ले ग्रामपंचायतीने ठराव देखील केला असून याबाबतचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे सादर करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.

वाडी शेवाडीतून अंजनविहिर, खर्दे मांडळ साठी पाटचारी करावी. वाडी शेवाडी धरण हे दरवर्षी पुर्ण क्षमतेने भरत असते उरलेले पाणी बुराई नदीव्दारे, तापी नदीव्दारे, समुद्राला मिळत असते पंरतू देगांव गावाजवळ जर पाटचारी केल्यास इथेदेखील नैसर्गिक उताराने अंजनविहीरे, खर्दे, मांडळ, दोंडाईचा, मंदाणे आदी गावांना कायमस्वरूपी लाभ होवू शकतो. ही मागणी आता अत्यंत कमी पर्जन्यमान असलेल्या या गावांनी केली असून त्यासाठी लवकरच शासन दरबारी प्रस्ताव सादर करण्याचा प्रयत्न सबंधीत गावांचा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या