Friday, May 3, 2024
Homeजळगावलसीकरणावरुन शाहू महाराज रुग्णालयात गोंधळ

लसीकरणावरुन शाहू महाराज रुग्णालयात गोंधळ

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

शहरातील महापालिकेल्या शाहू महाराज रुग्णालय हे लसीकरण केंद्र आहे. याठिकाणी आज बुधवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास लसीकरणावरुन नागरिकांनी येथील कर्मचार्‍यांशी वाद करत गोंधळ घातल्याची घटना घडली.

- Advertisement -

रांगेत उभे असतांना दुसर्‍याच कुणालातरी लसी दिल्याचा आरोप नागरिकांनी बोलतांना केले आहे. तर येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी रुग्णालयात 100 लसी मिळणार्‍या होत्या. त्या सर्वच्या सर्व लसी नागरिकांनाच दिल्याचा खुलासा केला आहे.

शहरातील रिंगरोडवरील महापालिकेच्या शाहू रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केले जात आहे. त्यानुसार आज नेहमीप्रमाणे याठिकाणी ज्येष्ठ नागरिक पोहचले तसेच 45 वर्षावरील व्यक्ती आले.

याठिकाणी नागरिक लसीकरणाच्या प्रतिक्षेत थांबले असतांना, ऐनवेळी नागरिकांना लसी संपल्या असल्याचे सांगून दुसर्‍या दिवशी येण्याचे सांगण्यात आले.

नागरिकांनी किती लसी आल्या होत्या असे पारिचारिकांना विचारले असता, 100 लसींची माहिती त्यांच्याकडून नागरिकांना देण्यात आली.

अधिकार्‍यांनी सारली कर्मचार्‍यांची बाजू

नागरिकांना मात्र प्रत्यक्षात 25 नागरिकांनाच लस दिल्याचे सांगत उर्वरीत 75 लस गेल्या कुठे असा प्रश्न उपस्थित केला.

तसेच रांगेत उभ्या नागरिकांना लसी न देता इतर कुणालाच लसी दिल्याचा आरोप करत नागरिकांनी गोंधळ घातला.

नागरिकांचा गोंधळ वाढल्याने येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी मध्यस्थी करत नागरिकांना बाहेर काढले.

यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांना नागरिक भेटले, 100 च लसी असल्याने त्या सर्वांना देण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या