Thursday, May 2, 2024
Homeनगरशालिनीताई विखे आदर्श उद्योजकता पुरस्काराने सन्मानित

शालिनीताई विखे आदर्श उद्योजकता पुरस्काराने सन्मानित

लोणी |प्रतिनिधी| Loni

महिला बचतगट चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक संधी प्राप्त करून देण्यासाठी पुढाकार घेणार्‍या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांना

- Advertisement -

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्यावतीने आदर्श व्यावसायिक उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने सन्मानित करण्यात येते. यावर्षी महिला बचतगट चळवळीत मोठे योगदान देणार्‍या शालिनी विखे पाटील यांना अकादमीने पुरस्कार देऊन सन्मानित केले.

ऑनलाईन पध्दतीने संपन्न झालेल्या राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन 2020 मध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. अकादमीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. कृष्णाजी जगदाळे उपस्थित होते.

शालिनी विखे पाटील यांनी जनसेवा फाउंडेेशनच्या माध्यमातून महिला बचतगटाची चळवळ यशस्वी सुरू केली. दहा हजारांपेक्षा जास्त महिलांचे संघटन या चळवळीत जोडले गेले. घरगुती उत्पादनापासून ते फुलांपासून अगरबती तयार करण्याच्या संकल्पनेला व्यावसायिकतेची जोड देऊन ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना उद्योगाच्या तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्याने बचतगटाच्या उत्पादनाचा नगर जिल्ह्याचा स्वतंत्र ब्रॅण्ड निर्माण झाला.

सौ. विखे यांच्या या कार्यक्षमतेची दखल घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्यावतीने यावर्षीचा आदर्श व्यावसायिक उद्योजकता पुरस्काराने गौरव केला आहे.

जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या बचतगटाच्या कार्याचा गौरव या पुरस्काराने झाला असून करोना संकटाच्या काळातही बचतगटाच्या उत्पादनाचे महत्त्व अधोरेखीत झाले. त्यामुळे आदर्श व्यावसायिक उद्योजकता पुरस्कार हा माझ्या महिला सहकार्‍यांना समर्पित करते. या चळवळीत योगदान देणार्‍या महिलांनी आत्मनिर्भरतेने पुढे जाण्यासाठी या पुरस्काराने प्रेरणा मिळाली असल्याची भावना सौ. विखे पाटील यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या