Wednesday, February 4, 2026
HomeनगरShani Shingnapur : शनैश्वर देवस्थानची सूत्रे जिल्हाधिकार्‍यांनी घेतली हातात

Shani Shingnapur : शनैश्वर देवस्थानची सूत्रे जिल्हाधिकार्‍यांनी घेतली हातात

प्रशासकीय कार्यालयातील सर्व दप्तर सील

सोनई |वार्ताहर| Sonai

श्री शनैश्वर देवस्थानातील अनियमितता, घोटाळे व वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने देवस्थानवर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांची प्रशासक म्हणून दि.22 सप्टेंबर रोजी नियुक्ती केली. काल शनिवारी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी शनिशिंगणापूरला येऊन शनिदर्शन घेऊन देवस्थानची सूत्रे हातात घेवून प्रशासकीय कार्यालयातील सर्व दप्तरे सील केली.
शनैश्वर देवस्थानमध्ये अवैध नोकरभरती, बनावट अ‍ॅप, आर्थिक गैरव्यवहार यासह अनेक गंभीर बाबीमुळे देवस्थानची चौकशी करण्याची मागणी भाजपचे ऋषिकेश शेटे, डॉ. वैभव शेटे यांच्यासह अनेकांनी करुन याबाबत गेल्या काही वर्षांपासून लढा उभारला होता व मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली होती.

- Advertisement -

अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले. मुंबई धर्मादाय आयुक्त कार्यालयात विश्वस्तांची सुनावणी सुरू होती. 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी राज्य शासनाने अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केल्याचा आदेश दिला. सध्या अतिवृष्टी व पूर परीस्थितीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले असल्याने जिल्हाधिकारी बैठकीत व नुकसान आढाव्यात व्यस्त असल्याने शनिवार दि. 26 रोजी दुपारी 12 वाजता शिंगणापूर येथे येऊन शनिदर्शन घेऊन कार्यालयीन अधीक्षक वाघ यांच्याकडून माहिती घेऊन देवस्थानचा कारभार हाती घेतला. त्यानंतर प्रशासकीय कार्यालय सील केले आहे.

YouTube video player

यावेळी आ. विठ्ठलराव लंघे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संभाजी दहातोंडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, युवा नेते ऋषिकेश शेटे, प्रांताधिकारी सुधीर पाटील, नेवासा तहसीलदार संजय बिरादार, अंकुशराव काळे, राजेंद्र मते, भाऊसाहेब वाघ, देविदास साळुंके, उदयकुमार बल्लाळ, पोलीस पाटील सयाराम बानकर, प्रताप चिंधे, सतीश गडाख, तुषार भुसारी सागर खोसे तसेच भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शनिदेवावर श्रद्धा असून येथील कारभार स्वच्छ व पारदर्शक करून भाविकांच्या सुखसुविधांकडे लक्ष घालणार असून येथे चुकीचे काम करणार्‍यांची गय केली जाणार नाही.
– डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...