Tuesday, February 3, 2026
Homeनगरशनीदेवाला केवळ ब्रॅण्डेड कंपनीचे तेल अर्पण करता येणार; विक्रेत्यांना सूचना

शनीदेवाला केवळ ब्रॅण्डेड कंपनीचे तेल अर्पण करता येणार; विक्रेत्यांना सूचना

शनिशिंगणापूर |वार्ताहर| Shani Shinganapur

श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे 1 मार्च पासून शनीदेवाला अर्पण करण्यासाठी केवळ ब्रँडेड कंपनीचेच तेल वापरण्याच्या सूचना देवस्थान विश्वस्त मंडळाने व्यावसायिकांना दिल्या आहेत. श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचा निर्णय तसेच शनिशिंगणापूर ग्रामसभेच्या निर्णयानुसार श्री शनि देवाच्या स्वयंभू शिळेची संभाव्य झिज टाळण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएआय) मान्यता प्राप्त खाद्यतेलच शनी मूर्तीवर अर्पण करण्याची परवानगी देण्याचे ठरले आहे.

- Advertisement -

त्यामुळे सर्व व्यावसायायिकांना विक्रीसाठी एफएसएसएआय मान्यता प्राप्त ब्रँडेड कंपनीचे खाद्यतेलच ठेवावे व अर्पण करण्यासाठी येणारे खाद्यतेलचे बॉटल, ड्रम, डबा इत्यादी पॅकिंगवर एफएसएसएआय परवाना क्रमांक असावा अशा सांगितले आहे. याव्यतिरिक्त शनी मंदिरात आलेले तेल न स्वीकारता मागे पाठविले जाईल, अशाप्रकारची नोटीस शनैश्वर देवस्थानच्या वतीने व्यावसायिकांना देण्यात आलेली आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Ajit Pawar Death : अजित दादांसारख्या लोकनेत्याला कायमचा मुकलो; शोकसभेत सर्वपक्षीय...

0
नाशिक | Nashik स्व.अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाने महाराष्ट्र एका लोकनेत्याला कायमचे मुकले आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर त्यांनी आयुष्यभर काम केले. त्यात कुठलीही...