Tuesday, February 3, 2026
HomeनगरShani Shingnapur : शिंगणापूर येथील शनि मंदिर देवस्थानची सुरक्षा रामभरोसे

Shani Shingnapur : शिंगणापूर येथील शनि मंदिर देवस्थानची सुरक्षा रामभरोसे

पोलीस व देवस्थान सुरक्षा व्यवस्थेत समन्वयाची गरज

सोनई |वार्ताहर| Sonai

जिल्हाधिकारी यांनी शनैश्वर देवस्थानची सूत्र हातात घेतल्यापासून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अनेक चांगले बदल घडविले आहे. कामात नेटकेपणा दिसत आहे स्वच्छता, भाविकांच्या सुविधेला प्राधान्य अशा अनेक कामाचे कौतुक होत आहे परंतु भाविकांच्या सुरक्षेसाठी शिंगणापूर पोलीस व देवस्थानची सुरक्षा व्यवस्था यांच्यात समन्वय साधून मंदिर परिसर व रस्त्यावर कडक सुरक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

दिल्ली येथे लाल किल्ल्याच्या परिसरात नुकताच बॉम्बस्फोट झाला त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील सर्व ठिकाणांसह देवस्थानच्या सुरक्षेचा आढावा घेण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना केल्या. शिंगणापूर येथेही सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी परिसर व शिंगणापूर मध्ये येणार्‍या वाहनांची कसून तपासणी केली होती तसेच सुरक्षा कर्मचारी व पोलीस कर्मचार्‍यांना परिसरामध्ये संशयास्पद वाटणार्‍या वाहनांची तपासणी करण्याच्या सक्त सूचना केल्या होत्या.

YouTube video player

शनिवार दि. 15 रोजी दुपारी शनिशिंगणापूर परिसरात सुरक्षेची पाहणी केली असता गेट नंबर दोनवर देवस्थानचे एक महिला व एक पुरुष कर्मचारी आहेत पण तेथून येणार्‍या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने ते दोन कर्मचारी येणार्‍या भाविकांची तपासणीसाठी पुरेसे नसल्याचे जाणवले. या ठिकाणी बॉम्ब शोध डिटेक्टर बसवलेले नाही. फक्त कर्मचार्‍यांकडूनच तपासणी होत असल्याने येणार्‍या सर्वांचीच तपासणी होत नसल्याचे जाणवल्याने देवस्थानचे कार्यकारी समितीतील सदस्य व शिंगणापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांना याविषयी सांगितले असता त्यांनी या गोष्टीची दुजोरा दिला. गेट नंबर दोन हे सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्याचा अहवाल या अगोदरच कार्यकारी समितीचे कार्यकारी अधिकारी यांना कळविल्याचे शेळके यांनी सांगितले.

देवस्थान सध्या सरकारच्या ताब्यात असून येथील व्यवस्था जिल्हाधिकार्‍यांना प्रशासक म्हणून पाहण्याचे आदेश आहेत. जिल्हाधिकार्‍यांनीही येथील दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी कार्यकारी समितीची स्थापना केली आहे. देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने सरकारच्या विरोधात याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी सुरू आहे पण येथे येणार्‍या भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी नेमकी कुणाची? हा प्रश्न असून एखादी मोठी घटना घडली तर प्रशासनाने जागे होण्याआधी त्याची उपाययोजना लवकरात लवकर करावी. भाविकांची सुरक्षेला महत्व द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

अधिकार्‍यांचे कौतुक
जुने विश्वस्त मंडळ असताना अनेक कर्मचार्‍यांना धाक राहिला नव्हता. ‘हम करे वो कायदा’ असे अनेक जण वागत होते परंतु आता मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी अनेक चांगल्या गोष्टी अमलात आणल्या असून देवस्थानच्या अनेक कर्मचार्‍यांची गोची झाली आहे पण भाविकांना चांगल्या सुविधा मिळत असल्याचे बोलले जात आहे. याचे परिसरात कौतुक केले जात आहे.

ताज्या बातम्या

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ च्या खर्चात १५ हजार कोटींची वाढ; आता...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai   कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) शेतकऱ्यांच्या (Farmer) विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'शक्तिपीठ' महामार्गाच्या आखणीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...