Friday, May 3, 2024
Homeनगरराहुरीच्या शरद कृषी महोत्सवात पाच कोटींची उलाढाल

राहुरीच्या शरद कृषी महोत्सवात पाच कोटींची उलाढाल

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी येथे शेतकर्‍यांसाठी करोना कालखंडाच्या दोन वर्षानंतर भरविण्यात आलेल्या शरद कृषी महोत्सवाला जिल्ह्यासह बाहेरील शेतकर्‍यांसह महिलांचाही खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काल अखेर पाचव्या दिवशी या महामेळाव्याची सांगता झाली. पाच दिवस चाललेल्या या कृषी महोत्सवात स्टॉलधारक व्यापार्‍यांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळतानाच सुमारे पाच कोटी रुपयांची उलाढाल झाली. या प्रदर्शनातून करोनामुळे मरगळ आलेल्या राहुरीच्या बाजारपेठेला अर्थसंजीवनी मिळाली.

- Advertisement -

यावेळी दीड टनी वजनाचा आणि कोटी रुपये किंमतीचा गजेंद्र नावाचा केरळ येथील शेतकर्‍याचा रेडा चांगलाच भाव खाऊन गेला. प्रदर्शनात शेतकर्‍यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सजलेल्या अवजारांची जत्राच भरली होती. शेतकर्‍यांनी ही नाविन्यपूर्ण अवजारे बघताना तोंडात बोटे घातली, तर खवय्यांनाही या प्रदर्शनातून पर्वणी साधता आली. महिलांना गृहोपयोगी वस्तू, शेतकर्‍यांना ड्रोनद्वारे औषध फवारणीचे प्रात्यक्षिक बघायला मिळाले.

या प्रदर्शनातून शेतकर्‍यांना शेतीसाठी पारंपरिक अवजारांऐवजी कमी खर्चात व कमी इंधनात शेती करण्याचे कसब उपलब्ध असलेल्या आधुुनिक तंत्रज्ञानाद्वारे परिपूर्ण असलेल्या अवजारांची माहिती मिळाली आहे. यावेळी अनेक शेतकर्‍यांनी अवजारांची खरेदी केली. प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. नवनवीन अवजारे बघून शेतकरी खूश झाले. असे प्रदर्शन भरविल्यास शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत्तील, तर विक्रेत्यांनाही चालना मिळेल.

– दत्तापाटील कवाणे, राहुरी

- Advertisment -

ताज्या बातम्या