Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar On Rohit Pawar : "त्याची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि...

Sharad Pawar On Rohit Pawar : “त्याची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची…”; शरद पवारांकडून रोहित पवारांबाबत मोठे संकेत

मुंबई | Mumbai

राज्यात विधानसभा निवडणुकांपूर्वीच (Assembly Elections) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या एक ते दोन महिन्यांत राज्यात निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मतदारसंघात चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) आणि महायुती (Mahayuti) यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू आणि पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांच्या मंत्रिपदाबाबत मोठे विधान केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : PM Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन; विरोधकांवर साधला निशाणा, म्हणाले…

शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल जामखेड तालुक्यातील खर्डा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी बोलतांना शरद पवारांनी “रोहितची पाच वर्ष आपल्या सेवेसाठी होती. आता या पुढच्या काळात त्याचे काम राज्यासाठी असेल”, असे म्हणत शरद पवारांनी त्यांच्या मंत्रिपदाचा घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले की,”मी १९७२ पासून मंत्रिमंडळात वेगवेगळ्या मंत्रालयात मंत्री म्हणून काम केले. माझी पाच वर्षे आमदार म्हणून गेल्यानंतर सत्तेचे एक नाही तर दुसरे ठिकाण हे मला मिळत गेले. मी गृह खात्याचा राज्यमंत्री झालो, कृषी खात्याचा मंत्री झालो, सुरुवातीच्या काळात राज्यमंत्री राहिलो. वसंतदादांचे सरकार गेल्यानंतर मी स्वतःच मुख्यमंत्री झालो. केवळ एकदाच मुख्यमंत्री झालो नाही तर चार वेळेला मुख्यमंत्री झालो”, असा घटनाक्रम पवारांनी सांगितला.

हे देखील वाचा : Political Special : महायुतीकडून जातीय समीकरण राखण्याचा प्रयत्न

पुढे ते म्हणाले की, “रोहितचे कामदेखील तशाच प्रकारचे आहे. तुमच्याकडून रोहित पवार (Rohit Pawar) यांना मंत्री बनवण्याची मागणी होते, मात्र त्याने आतापर्यंत कधी कुठल्याही पदाची मागणी केलेली नाही. रोहितची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आणि ही महाराष्ट्राची सेवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारची असेल”, असे सूचक वक्तव्य करत शरद पवारांनी रोहित पवारांच्या मंत्रि‍पदाचे संकेत दिले.

हे देखील वाचा : राज्यात विधानसभा निवडणूक केव्हा लागणार? शरद पवारांनी सांगितली तारीख

नाशिकमध्ये रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले फलक

आज आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये भावी मुख्यमंत्री असे फलक लावण्यात आले आहेत. नाशिक शहरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हे फलक लावले आहे.त्यासोबतच राज्यातील अनेक ठिकाणी देखील रोहित पवारांचे फलक लागले आहेत. काल शरद पवारांनी केलेल्या विधानानंतर आज रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक झळकल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत रोहित पवारांचेही नाव तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...