Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडे प्रकरणात आमचा निष्कर्ष बरोबर होता - शरद पवार

धनंजय मुंडे प्रकरणात आमचा निष्कर्ष बरोबर होता – शरद पवार

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा या तरुणीने इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार मुंबईतल्या ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान,

- Advertisement -

रेणू शर्माकडून कौटुंबिक कारण देत तक्रार मागे घेत असल्याचे पत्र पोलिसांना दिले आहे. यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार यांनी म्हंटले आहे की, “रेणू शर्मानी धनंजय मुंडे विरोधातील केस परत घेतली असल्याचं समजले आहे. आम्हाला प्रथमदर्शनी सत्य पडताळण्याची गरज वाटते. याच्या खोलात जाण्याची गरज आहे असं मी आधीच म्हटलो होतो. आमचा निष्कर्ष बरोबर होता असं आता वाटतंय. त्यामुळे आता जे झालं त्यानुसार आमचा निर्णय योग्य होता” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच शरद पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मराठा आरक्षण हा विषय न्यायालयात आहे. महाविकासआघाडी आरक्षणाच्या बजूने आहे. आरक्षण टिकावे यासाठी राज्य सरकारने न्यायालयात देशातील उत्तमोत्तम वकील आपली बाजू मांडण्यासाठी दिले आहेत असे शरद पवार यांनी म्हटले. केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात कृषी कायद्यावरुन निर्माण झालेला तीढा सुटला नाही. केंद्र सरकारने संमत केलेले कृषी कायदे 18 महिन्यांसाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांना दिला आहे. परंतू शेतकरी संघटनांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत हे संपूर्ण कायदे मागे घ्यावेत असे केंद्र सरकारला सांगिल्याचेही पवार या वेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या