Sunday, September 8, 2024
Homeराजकीयविधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटलांचा पराभव कसा झाला? भुजबळांसोबत नेमकी काय चर्चा झाली?...

विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटलांचा पराभव कसा झाला? भुजबळांसोबत नेमकी काय चर्चा झाली? शरद पवारांनी सगळचं सांगितलं

पुणे | Pune

लोकसभेनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) पडघम वाजू लागले असून त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यासाठी मविआतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने कंबर कसली असून पक्षफुटीनंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर आज शरद पवारांच्या उपस्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) घेतलेली भेट, ओबीसी-मराठा आरक्षणावरून राज्यात सुरु असलेला वाद आणि विधानपरिषद निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांचा झालेला पराभव यासह विविध विषयांवर सविस्तर भाष्य केले.

- Advertisement -

हे देखील वाचा : शरद पवार नाशकातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?

यावेळी भुजबळ यांनी घेतलेल्या भेटीवर बोलतांना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, “भुजबळ घरी आले, ते मला भेटले, त्यांनी आरक्षणाच्या बाबतीत काही गोष्टी सांगितल्या. महाराष्ट्राचे हित हवे असेल तर तुम्ही या चर्चेमध्ये येण्याची गरज असल्याचे भुजबळांनी म्हटले. मनोज जरांगे आणि मुख्यमंत्र्यामंध्ये काय चर्चा झाली त्याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही. जरांगेचे उपोषण सुरू असताना काही मंत्र्‍याचे शिष्टमंडळ देखील गेले होते. त्यांच्यामध्ये काय बोलणे झाले माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यातील सुसंवाद आम्हाला माहिती नाही. त्यांची माहिती घेऊन बैठक घेऊ”, असे भुजबळ यांनी म्हटल्याचे शरद पवारांनी सांगितले.

हे देखील वाचा : “बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे…”; मुख्यमंत्र्यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे

तर जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या पराभवाबाबत बोलतांना शरद पवार म्हणाले की, “विधान परिषद निवडणुकीत मला रस नव्हता. कारण, राष्ट्रवादीकडे फक्त १२ मते होती. शेतकरी कामगार पक्षाला निवडणुकीत पाठिंबा द्यावा, असे वाटले. कारण, लोकसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणून एकत्र लढलो. एकत्र लढताना डाव्यांमधील सीपीआय, सीपीएम, शेतकरी कामगार पक्षाने आमच्याकडे काही जागा मागितल्या होत्या. पण, त्या जागा देण्याचा स्थितीत आम्ही नव्हतो. येणाऱ्या विधान परिषद किंवा विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाला संधी देऊ, असे मित्र पक्षांना सांगितले होते. ते सर्व पक्षांनी मान्य केले”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : ‘लाडकी बहिण’नंतर आता लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा मिळणार ‘इतकी’ रक्कम

पुढे ते म्हणाले की, “विधानपरिषद निवडणुकीत एका उमेदवाराला देण्यासाठी काँग्रेसकडे ३७, राष्ट्रवादीकडे १२, ठाकरे गटाकडे १६ मते होती. परंतु, माझे गणित वेगळे होते. काँग्रेसने एक नंबरचे मत कुणालाही द्यायचे नाही. निवडून येण्यासाठी २३ मते हवी होती. काँग्रेसकडील ३७ मते सगळीच त्यांच्याच उमेदवाराला द्यायला हवी होती. दोन नंबरची मते विभागून ५० टक्के शेकाप आणि ५० टक्के शिवसेनेच्या उमेदवाराला द्यायची होती. एक नंबरची मते गरजेपेक्षा जास्त असल्याने ती ‘ट्रान्सफर’ होत अधिकची मते दोन नंबरच्या उमेदवारांना मिळतील. दोन नंबरील पहिले मत शिवसेनेला द्यावे. शिवसेनेच्या दोन नंबरने पहिले मत शेकापला द्यावे, अशी ‘स्ट्रॅटर्जी’ केली असती, तर तीनही उमेदवार निवडून आले असते. हे गणित सगळ्यांना मान्य आहे, असे नाही. मात्र, असे झाले नसल्याने जयंत पाटलांचा पराभव झाला. कुणी कुणाला फसवले नाही,” असे शरद पवारांनी सांगितले.

हे देखील वाचा : “महाराष्ट्रात जातीपातीचं विष इतकं खोलवर रुजत चाललं की…”, राज ठाकरेंनी विठुरायाकडे व्यक्त केली खंत

तर आरक्षणाच्या (Reservation) मुद्द्यावर बोलतांना शरद पवार म्हणाले की, “ओबीसी नेत्यांचे उपोषण सुरू होते. तिथे राज्य सरकारचे मंत्री गेले. त्यांचे काय बोलणे झाले माहीत नव्हते. त्यांच्यातील सुसंवाद माहीत नव्हता. त्यामुळे मिटिंगला जाण्याचे कारण एकच होते की, सरकार जरांगे आणि ओबीसीं नेत्यांशी बोलत आहेत. त्यानंतर नेते काही विधाने करत आहेत. पण संवाद काय झाला आणि प्रस्ताव काय होता हे लोकांना आणि आम्हाला माहीत नव्हते. त्यामुळे जरांगे यांना सरकारने काय आश्वासन दिले याचे वास्तव चित्र आपल्याकडे येत नाही आणि दुसऱ्या बाजूने ओबीसींना जी कमिटमेंट केली त्याची माहिती येत नाही, तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यांनी आम्हाला माहिती दिली तरच आम्ही जाऊ शकतो असे ठरवलं. त्यांनी ४०-५० लोकांना बोलावले आणि चर्चा केली. तिथे मत मांडावे असे योग्य वाटले नाही”, असेही शरद पवार यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या