बारामती | Baramati
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर वेगवेगळ दावे करण्यात येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनिकरणाबाबत दिवंगत अजितदादा पवार अनुकूल होते आणि १२ फेब्रुवारी रोजी तशी घोषणा होणार होती असाही दावा करण्यात येतो. तर दुसरीकडे अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नाही. महापालिका निवडणुकीपूरताच हा निर्णय झाल्याचे दादांच्या राष्ट्रवादी गटाचे म्हणणे आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा झाली असती तर मित्र पक्ष म्हणून अजितदादांनी आम्हाला सांगितले असते, असे वक्तव्य केले होते. त्यावर आता शरद पवार यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत चांगलेच सुनावले.
शरद पवार यांनी आज सकाळी बारामती येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांचा चांगलाच समाचार घेतला. विलीनीकरणाच्या चर्चेत ते कुठेही नव्हते असा उल्लेख करत त्यांना बोलण्याचा काय अधिकार असाही प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला. जयंत पाटील आणि अजित पवार हे यावर चर्चा करत होते, असे त्यांनी पुन्हा नमूद केले. त्यामुळे राष्ट्रवादी विलीनिकरणाच्या चर्चा सुरू होती असं शरद पवार यांनी पुन्हा अधोरेखित केल्याचे दिसून येते.
सध्याच्या राजकारणावर भाष्य करायचे नाही
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी अतिघाई केली आणि त्यांनी लगेचच शपथविधीचा कार्यक्रम घेतल्याची टीका होत आहे, याबद्दल विचारले असता शरद पवार म्हणाले की, मला यावर कोणतेही भाष्य करायचे नाही. तसेच, यावेळी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. यावर शरद पवार म्हणाले की, त्यांना संधी दिली याचा आनंद आहे, असे म्हणत आपली पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
भारत अमेरिका करारावर भाष्य
महाराष्ट्र विधानसभा लोकसभा राज्यसभा गेले ५८ वर्ष आहे. ५८ वर्षात संसदेत माझी कधीही गैरहजरी नव्हती. अर्थसंकल्पातून ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा होती. अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी कराराबाबत दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे, असे पवार म्हणाले.
अमेरिकेने काही समाधानकारक निर्णय घेतले.अमेरिकेने आपल्या देशवाबाबत टॅरिफ कमी केले. दोन दिवसांत भारत आणि अमेरिका बाबत चित्र स्पष्ट होईल. निर्यात करता येईल, ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. अमेरिका शक्तिशाली देश आहे. त्यांनी निर्यात करायला सुरुवात केली तर आपल्या शेतीवर परिणाम होईल असे वाटते, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





