Friday, November 22, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार?

मुंबई । Mumbai

येत्या काळात देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात भुकंप पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याला कारण ठरलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांचं एक वक्तव्य.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष जवळ येतील. काही पक्ष काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होतील, असं वक्तव्य शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. शरद पवार यांनी केलेल्या या मोठ्या वक्तव्यामुळे आगामी काळात राजकीय वर्तुळात मोठा भुकंप होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. (Sharad Pawar News)

हे ही वाचा : मतदाराने थेट ईव्हीएम मशीन दिले पेटवून; ‘हे’ कारण आलं समोर

शरद पवार यांनी या मुलाखतीत म्हटले की, पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील, असं भाकित शरद पवार यांनी वर्तवलं. दरम्यान शरद पवारांना तुमचा राष्ट्रवादी पक्षदेखील कॉंग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, काँग्रेस आणि आमच्यामध्ये फारसा फरक नाही. आमची विचारधारा सारखीच आहे. आम्ही गांधी, नेहरु यांची विचारधारा मानतो. पण मी आताच काही आमच्या पक्षाबद्दल सांगु शकत नाही. पक्षामधील सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच घाईमध्ये कोणताही निर्णय घेतला जाणार नसल्याचं शरद पवारांनी सांगितलं.

हे ही वाचा : भाजप सरकार संकटात; तीन अपक्ष आमदारांनी सोडली साथ

या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व त्यांच्या शिवसेनेबाबतही (Shivsena UBT) भाष्य केले. शरद पवार म्हणाले, उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या समवीचारी पक्षांबरोबर काम करण्यास सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरेंचे विचारही आमच्यासारखेच आहेत. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान त्यांना जाणवले की, महाराष्ट्रात सत्ताधारी भाजव विरोधात वातावरण आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशासह देशातील इतर भागांतही भाजपविरोधात वातावरण असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या