Wednesday, January 7, 2026
Homeनाशिकशरद पवार नाशकातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?

शरद पवार नाशकातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?

नाशिक | Nashik

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर काल भुजबळांनी नाशकात (Nashik) दाखल होत विविध विकासकामांचे उद्घाटन आणि पाहणी केली. यानंतर आता शुक्रवारी शरद पवार हे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटलांचा पराभव कसा झाला? भुजबळांसोबत नेमकी काय चर्चा झाली? शरद पवारांनी सगळचं सांगितलं

YouTube video player

शरद पवार नाशिक दौऱ्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून पवार काय संदेश देतात याची राजकीय नेत्यांना उत्सुकता असून या मेळाव्याच्या माध्यमातून ते नाशकातूनच आगामी विधानसभा निवडणुकीचे (Vidhansabha Election) रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. शरद पवार यांचे जुने सहकारी आणि सहकार क्षेत्रातील नेते दिवंगत मालोजीराव मोगल यांच्या जयंती व पुण्यतिथी एकाच दिवशी आहे. त्यानिमित्त नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चितेगाव फाटा येथे हा मेळावा होत आहे.

हे देखील वाचा : “बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे…”; मुख्यमंत्र्यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होत असून यानिमित्ताने महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ वाढविण्याचा कार्यक्रम म्हणून देखील याकडे पाहिले जात आहे. तसेच या मेळाव्याला मोगल यांच्यासह काम केलेल्या अनेक नेत्यांची उपस्थिती असणार आहे. तसेच या मेळाव्यास नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे, भास्करराव भगरे आणि डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bacchav) हे उपस्थित राहणार असून त्यांचा सत्कार यावेळी शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.

हे देखील वाचा : “महाराष्ट्रात जातीपातीचं विष इतकं खोलवर रुजत चाललं की…”, राज ठाकरेंनी विठुरायाकडे व्यक्त केली खंत

तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यात (Ahemdnagar District) स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या कुटुंबियांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शरद पवार हजेरी लावणार आहेत. स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या मेळाव्यात शरद पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...